रायगड - अलिबाग शहरातील एका मोबाईल शॉपला आज (सोमवारी) पहाटेच्या सुमारास आग लागली. या घटनेतत शेजारची अन्य ३ दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. मात्र, आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील अंकुर सुपर मार्केटसमोर नेहा मोबाईल शॉप आहे. या शॉपला आज पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. आग वेगाने पसरल्यामुळे बाजूची ३ दुकानेही जळून खाक झाली. या घटनते सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - किल्ले रायगडावरील रोपवे सेवा पाच दिवस राहणार बंद
अलिबाग नगरपालिका आणि आरसीएफच्या अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली आहे. परंतु, या आगीमागचे कारण कळलेले नाही. तर, दुकानदाराचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - राज्यमंत्री आदिती तटकरेंकडे ८ विभागाचा पदभार, विधी व न्याय विभागाचाही समावेश