खालापूरात(रायगड)- संपूर्ण महाराष्ट्र भर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात या अभियानाला तळागाळातून पसंती मिळत आहे. अनेकांनी मनसेचे प्रतिनिधित्व स्विकारले असून या अभियानाला खालापूर तालुक्यात १७ मार्च पासून प्रारंभ झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य व्हा - असे म्हणत मनसेन खालापूरात सभासद नोंदणी सुरू केली आहे. या अभियानाची सुरूवात मनसेच्या खालापूर तालुका जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला संपूर्ण राज्यात सुरुवात झाली आहे. राज्यभरात ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने हे अभियान सुरु आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये कुटुंबीयांसोबत या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात केली आहे. या सदस्य नोंदणी अभियानाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी विविध क्षेत्रातील लोकांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे. खालापूरात देखील हजारो तरुण-तरुणींनी मनसेचे प्रतिनिधित्व स्विकारले आहे. तर पुढच्या काळात राज्यात विविध निवडणूका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक ताकत आणि जनाधार भक्कम करण्याच्या दृष्टीने या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे. त्यादृष्टीने खालापूरातून ही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
हेही वाचा-मुंबई पोलिसांची एवढी बदनामी कधीच झाली नाही, शेलार यांची महाविकास आघाडीवर टीका