ETV Bharat / state

विरोधकांच्या दादागिरीमुळे यंदाची निवडणूक लढवतोय - सुरेश लाड

आर्थिक कारणामुळे या वेळची निवडणूक मी लढवणार नव्हतो, पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तसेच मतदारसंघातील दादागिरी रोखण्यासाठी निवडणूक लढत असल्याचे आमदार सुरेश लाड यांनी स्

आमदार सुरेश लाड
author img

By

Published : Oct 11, 2019, 3:29 PM IST

रायगड - राज्याची विधानसभा निवडणूक दोन आठवड्यावर येऊन ठेपली आहे. रायगड जिल्ह्यातील राजकीय समिकरणेही बदलले आहेत. आर्थिक कारणामुळे या वेळची निवडणूक मी लढवणार नव्हतो, पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तसेच मतदारसंघातील दादागिरी रोखण्यासाठी निवडणूक लढत असल्याचे आमदार सुरेश लाड यांनी स्पष्ट केले. लाड हे राष्ट्रवादी काँग्रसतर्फे कर्जत विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत.

आमदार सुरेश लाड यांच्याशी खास बातचीत

हेही वाचा - .... आता पोत्यात पैसे नेले तर खिशात सामान येते - छगन भुजबळ

लाड मागील दहा वर्ष या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. यावेळी त्यांना हॅटट्रिकची संधी असताना त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच ते शिवसेनेच्याही संपर्कात असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, शेवटी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणुकीच्या रणांगनात पुन्हा उडी घेतली.

प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवारावर लाड यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, निवडणूक न लढवण्याचे मुख्य कारण हे आर्थिक होते तरीही काही ठराविक लोकांनी सुरू केलेली दादागिरी व दडपशाही तसेच स्वपक्षातील लोकांवरही खोट्या केसेस करून जो दहशतवाद निर्माण केला आहे. अशा परिस्थितीत त्यांना विरोध करण्यासाठी तुम्हीच लढले पाहिजे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केल्यामुळे आपण ही निवडणूक लढवत असल्याचे लाड यावेळी म्हणाले.

हेही वाचा - आम्ही शरद पवारांना स्वस्थ बसू देणारच नाही - उध्दव ठाकरे

Intro:ठराविक लोकांची दादागीरी व दहशतवाद मोडून काढण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर घेतली उमेदवारी - आमदार सुरेशभाऊ लाड, नाव न घेता शिवेसेनाच्या उमेदवारावर केली टिका
रायगड - आर्थिक कारणामुळे या वेळची निवडणूक आपण लढ़वनार नव्हतो पण स्वपक्षीय व आघाडीचे घटक पक्षातील कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर काही ठराविक लोकांची सुरु असलेली मतदार संघातिल दादागिरी व दडपशाहिचा दहशवाद रोखण्या साठी मीच पुन्हा उमेदारी घ्यावी असा आग्रह झाल्याने निवडणूक लढ़वनार असल्याचे सुरेश लाड यांनी स्पष्ट केले व एक प्रकारे नाव न घेता प्रतिस्पर्दी शिवसेना युती च्या उमेदवारावर आरोप केले.Body:कर्जत मतदार संघाचे राष्ट्रवादी व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार सुरेशभाऊ लाड मागील दहा वर्ष या मतदार संघातुन विधानसभेवर निवडून गेले आहेत या वेळी त्याना हैट्रिक चा चांस असताना ही त्यांनी निवडणूक न लढवन्याचा निर्णय घेतला होता व ते मातोश्री च्या संपर्कात असून शिवसेनेत दाखल होऊन सेने तर्फे निवडणूक लढ़वनार अश्या चर्च्या सुरु झाल्या होत्या पण शेवटी राष्ट्रवादी तर्फे त्यांनी अर्ज भरीत या निवडणुकीच्या राणांगनात पुन्हा उड़ी घेतली
मागिल घडलेल्या घटनानबाबत सविस्तर सांगताना आमदार सुरेशभाऊ लाड यांनी प्रतिस्पर्दी शवसेनेच्या उमेदवारावर गंभीर आरोप केले त्यांनी बोलताना सांगितले की निवडणूक न लाढवन्याचे मुख्य कारण हे आर्थिक होते तरीही काही ठराविक लोकांनी सुरु केलेली दादागिरी व दडपशाही तसेच स्वपक्षतील लोकानवरही खोट्या केसेस करून काहीनचे हातपाय तोडित जो दहशतवाद निर्माण केला आहे अश्या परिस्तितित त्याना विरोध करण्याच्या साठी तुम्हीच लढले पाहीजे असा आग्रह स्वपक्षातिल, आघाडीचे घटक पक्षातील कार्यकर्ते व शिवसेना भाजपा तिल काही हितचिंतक मित्रांच्या प्रेमळ आग्रहा खातर मतदार संघाच्या हितासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत,
Conclusion:आपल्या उमेदवारी बाबत सांगताना नाव न घेता आमदार सुरेशभाऊ लाड यांनी प्रतिस्पर्दी शिवसेना युतिच्या उमेदवारावर दादागिरी व दहशतीचे आरोप केलेत प्रचाराचे अवघे आठ दिवस बाकी राहिले असताना कर्जत विधानसभेचे राजकीय वातावरण तापायला लागल्याचे दिसत असून मतदानाची तारीख जस जशी जवळ येत जाईल तसेतसे आरोप प्रत्यारोप हे वाढतच जातील हे मात्र नक्की
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.