ETV Bharat / state

शेकापच्या मतांमुळेच नगराध्यक्षा निवडून आल्या, परंतु शेकापला वागणूक चुकीची - आमदार जयंत पाटील - खोपोली नगरपंचायत

नगरपरिषदेत दहा नगरसेवक असतानाही मागील निवडणुकीत कमी जागांंवर निवडणूक लढवली आणि शेकापच्या मतांमुळेच खोपोलीच्या नगराध्यक्षा अल्पमतात निवडून आल्या. परंतु सत्ताधारी ज्या पध्दतीने वागणूक आणि धोरण ठरवतात ती चुकीची असून त्यामुळेच शहरातील विकासकामे झाली नाही, अशी खंत आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

आमदार जयंत पाटील
आमदार जयंत पाटील
author img

By

Published : Aug 8, 2021, 7:26 PM IST

(खालापूर) रायगड - नगरपरिषदेत दहा नगरसेवक असतानाही मागील निवडणुकीत कमी जागांंवर निवडणूक लढवली आणि शेकापच्या मतांमुळेच खोपोलीच्या नगराध्यक्षा अल्पमतात निवडून आल्या. परंतु सत्ताधारी ज्या पध्दतीने वागणूक आणि धोरण ठरवतात ती चुकीची असून त्यामुळेच शहरातील विकासकामे झाली नाही, अशी खंत आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. तसेच देशात पुरोगामी विचार असावा आणि भाजपाला विरोध करण्यासाठी आम्ही आघाडीत आहोत. मात्र पुढील निवडणुका आघाडीत लढायच्या की स्वबळावर याची चर्चा कार्यकर्त्यांशी करून निर्णय घेवू अशी प्रतिक्रिया शेकापचे जिल्हा चिटणीस तसेच विधानपरिषदेचे आमदार जयंत पाटील यांनी खोपोलीतील पक्षप्रवेश कार्यक्रमात दिली.

शेकापच्या मतांमुळेच नगराध्यक्षा निवडून आल्या, परंतु शेकापला वागणूक चुकीची

खोपोलीतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश -

8 अॉगस्ट रोजी खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रविण गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शेकाप पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत जिल्हा चिटणीस तसेच विधानपरिषदेचे आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत खालची खोपोली येथील कमलाबेन सभागृहात जाहीर पक्षप्रवेश केला आहे. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा सहचिटणीस किशोरभाई पाटील, ज्येष्ठ नेते संतोष जंगम, तालुका चिटणीस संदीप पाटील, शहर चिटणीस अविनाश तावडे, नगरसेवक दिलीप जाधव, उपनगराध्यक्ष अरूण पुरी, ज्येष्ठनेते श्याम कांबळे, कैलास गायकवाड, रविंद्र रोकडे, अँड.रामदास पाटील, नगरसेवक संजय पाटील, आनंद नायडू, खजिनदार जयंत पाठक, दिनेश गुरव, राजू अभाणी, हानिफ दुदुके, मनोज माने यांच्यासह शहर कार्यकारणीतील पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार जयंत पाटील म्हणाले की, खोपोली नगरपालिका अ गटातील असून उत्पन्नही चांगले आहे. मात्र ज्या पध्दतीने फंडीग आणि विकास करायला हवा होता तो झालेला नाही. अलिबाग नगरपालिका आणि खालापूर नगरपंचायत शेकापच्या ताब्यात असून कोणतीही पाणीपट्टी, घरपट्टीत वाढ केलेली नाही. अतिक्रमण हटवितानाचा वाद कोर्टात न नेता समोपचाराने मिटवून रस्ते वाढविले असल्याचे उदाहरण दिले. खोपोली शहरात दलित आणि आंबेडकरवादी समाज मोठ्या प्रमाणात आहे. ते एकत्रित नाही हे दुर्देव आहे. जे प्रस्तापित होतात ते समाजाला विसरतात अशी खंत आ.पाटील यांनी व्यक्त केली.

खोपोली शहरातील लोकांनी व्यक्तिगत प्रेम केले असून दहा ते बारा वर्षापूर्वी आम्ही संघटन केले होते. त्यावेळेस आता असणारे लोक असते तर नगरपालिकेच्या निवडणुकीत चित्र बदलेले असते. शेकाप पक्ष सर्व विभागातील शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असल्यामुळे एक कोटी भाव मिळणार आहे, केटीएस कर्जामुळे बंद पडणार होती साडेचार कोटी कर्ज काढून शिक्षण संस्था चालू ठेवत सर्व पक्षीय आणि व्यापारी सदस्य म्हणून काम करीत आहे. कोरोना काळात दहा लाखाचे वैदयकीय साहित्य खोपोलीसाठी उपलब्ध करून दिले. शेकापकडे व्हिजन असून शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.