रायगड - कर्जत तालुक्यातील शासकीय आदिवासी कन्या आश्रमशाळेत विद्यार्थिनीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ती भालीवडी आश्रमशाळेतील विद्यार्थीनी आहे.
दरम्यान, या विद्यार्थिनीवर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करत पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.