रायगड- कोरोनामुळे हतबल झालेल्या ३०० युनिटस पर्यंत वीज देयक असणाऱ्या ग्राहकांचे ६ महिन्यांचे वीजबिल माफ करावे. या मागणीसाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, जनता दल, आम आदमी पक्ष, सामर्थ्य जनशक्ती संघटना यांच्यावतीने रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना संयुक्त निवेदन देण्यात आले.
वीजबिल माफ झाल्यास रायगड जिल्ह्यातील ग्राहकांना दिलासा
तसेच महावितरणने कोरोना काळात पाठवलेली वाढीव व चुकीची बिले, बिले दुरूस्ती करण्यास महावितरणच्या आधिकाऱ्यांची असमर्थता, जिल्ह्यातील नागरीकांच्या उत्पन्नाची मर्यादा व वीजबिल माफ झाल्यास रायगड जिल्ह्यातील ग्राहकांना दिलासा मिळेल असे मत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष विजय खारकर यांनी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष व जनता दलाचे रायगड जिल्हा सचिव विजय खारकर, संघटनेचे आलिबाग तालुका अध्यक्ष सचिन उल्हास पाटील, आप चे दिलीप जोग, जनता दलाचे खालापूर तालूका उपाध्यक्ष परेश खारकर, चौक विभाग अध्यक्ष साईनाथ ठाकूर, रसायनी विभाग अध्यक्ष किशोर पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा- राज्यात शुक्रवारी 25 हजार 681 नव्या कोरोना रुग्णांची नोंद