ETV Bharat / state

कोरोना: महाड शहर आजपासून 8 दिवस बंद - महाड कोरोना न्यूज

महाड शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे आजपासून (सोमवार) 8 दिवस महाड शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

Mahad city close for 8 days due to corona in raigad
कोरोना: महाड शहर आजपासून 8 दिवस बंद
author img

By

Published : Jul 6, 2020, 5:13 PM IST

रायगड - दिवसेंदिवस महाड शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे आजपासून (सोमवार) 8 दिवस महाड शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

Mahad city close for 8 days due to corona in raigad
कोरोना: महाड शहर आजपासून 8 दिवस बंद
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महाड तालुक्यातही कोरोनाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. महाड तालुक्यात आतापर्यंत 68 कोरोनाचे रुग्ण आढळले असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. 36 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत महाड तालुक्यात 25 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.

महाड तालुक्यात वाढत असलेला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून महाड शहर 8 दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाड शहरातील सर्व व्यवहार बंद असून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. महाड शहरात लॉकडाऊन केल्याने शहरातील रस्ते हे पुन्हा एकदा निर्मनुष्य पाहायला मिळाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.