रायगड - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेली 3 मे पर्यंतची टाळेबंदी रायगड जिल्ह्यात सुरुच राहणार आहे. जिल्ह्यातील एमएमआरडीए क्षेत्रातील सहा तालूके तसेच 9 कंटेनमेंट झोनमधील व्यवहारांवर असलेली बंदी कायम असणार आहे. मात्र, शेतीची कामे व महात्मागांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची (नरेगा) कामे सुरू राहतील, असे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज जाहीर केले. त्यामुळे टाळेबंदीतून सुटका होण्याचे रायगडकरांचे स्वप्न भंग पावले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळेबंदीचा कालावधी 3 मेपर्यंत वाढविला. त्याचवेळी 20 एप्रिल पर्यंत परिस्थिती पाहून काही ठिकाणी टाळेबंदी शिथील करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे पंतप्रधांनी सांगितले होते. रायगड जिल्ह्यात पनवेल महानगर पालिका तसेच पनवेल तालुक्याच्या काही भागत कोरोनाचे रुग्ण आढळून आले. उरण तालुक्यात कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे रायगड जिल्ह्यात पनवेल व उरण तालुका वगळून उर्वरीत ग्रामीण भागात टाळेबंदी शिथील केली जाईल अशी रायगडकरांना अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली.
रायगड हा मुंबईपासून खूपच जावळ आहे. त्यामुळे या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त केली जात होती. परंतु कोरोनाचा प्रदुर्भाव मोठ्याप्रमाणवर होण्यापसून रोखण्यात आम्हाला यश आले आहे. जिल्ह्यात 49 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होण्याचा वेग देखील कमी आहे. असे असले तरी जिल्ह्यातील एमएमआरडीए क्षेत्रात असलेले पनवेल, उरण, अलिबाग, पेण, खालापूर व कर्जत या सहा तालुके. तसेच जे भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत तेथे टाळेबंदी कायम राहणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुबई, पुण्यातून आलेल्यांची माहिती लपवणार्यांवर कारवाई करणार
22 मार्चपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. तेव्हापासून मुबई, ठाणे, पुणे या शहरातून लोक रायगड जिल्ह्यात आले. त्या सर्वांची महिती घेण्यात आली आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. 22 मार्चासून जे आलेत त्यांचा कॉरेंटाईनचा 28 दिवसांचा कालावधी संपला आहे. 1 एप्रिल नंतर आलेत त्यांचे 20 दिवस झाले आहेत. 1 एप्रिलनंतर आले आहेत त्यांना क्रवारंटाईनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्यावर आरोग्य विभागाची नजर आहे. ज्यांना क्वारेंटाईन करण्यात आले आहेत त्यांनी घरातून बाहेर पडू नये. जे बाहेर पडतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. परजिल्ह्यातून आलेल्यांची माहिती लपविणार्यांवर देखील भारतीय दंड संहिता कलम 144 नुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.
मुंबई, पुण्यातून आलेल्यांना क्रवारंटाईन करण्यात आले आहे. याचा अर्थ ते सर्व कोरोना पॉझिटिव्ह आहेत असा होत नाही. त्यातुळे लोकांनी घाबरू नये. सार्वांनीच खबरदारी घ्यावी. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हधिकार्यांनी केले.
जे लोक टाळेबंदीच्या कालावधीत इतर जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून रायगड जिल्ह्यात आले आहेत त्यांची माहिती जमा करण्यात आली आहे. अजूनही कुणी आले असतील तर अशा व्यक्तीची माहिती 100 या क्रमांकावर द्यावी, असे आवाहन रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी केले.