ETV Bharat / state

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

चिपळूण येथे मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी सातारा येथील एनडीआरएफ टीम बचाव कार्यासाठी निघाली होती. मात्र, दरड कोसळून रस्ता बंद झाल्याने एनडीआरएफ पथक अडकून पडले आहे. त्यामुळे चिपळूणच्या बचाव कार्याला उशीर होण्याची शक्यता आहे.

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दरड कोसळली
author img

By

Published : Aug 5, 2019, 8:45 PM IST

रायगड - पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दाभिल गावाच्या हद्दीत रस्त्यावर मोठी दरड कोसळली. त्यामुळे मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या ठिकाणी दोन्ही बाजूने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग महाड, यांनी दरड हटवण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, दरड काढण्यास 5 ते 6 तास लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी पोलादपूरच्या शिवाजी चौक येथे बॅरिकेट्स लावून वाहतूक बंद केली आहे. दरम्यान, चिपळूण येथे मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी सातारा येथील एनडीआरएफ टीम बचाव कार्यासाठी निघाली होती. मात्र, दरड कोसळून रस्ता बंद झाल्याने एनडीआरएफ पथक अडकून पडले आहे. त्यामुळे चिपळूणच्या बचाव कार्याला उशीर होण्याची शक्यता आहे.

दरड कोसळण्याची माहिती मिळताच पोलीस व महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जेसीबीच्या सहाय्याने मातीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, रस्ता पूर्ववत होण्यास 5 ते 6 तास लागण्याची शक्यता आहे.

Intro:पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर आंबेनळी घाटात दरड कोसळली

मातीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू

वाहतूक पूर्ववत होण्यास पाच ते सहा तास लागण्याची शक्यता

चिपळूण कडे बचावासाठी येणारे एनडीआरएफ पथक अडकले

रायगड : पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये दाभिल गावाच्या हद्दीत रस्त्यावर मोठी दरड कोसळली असून मातीचा ढिगारा रस्त्यावर आली आहे. यात कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी दोन्हीही बाजूने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांनी दरड हटवायचे काम सुरू केले आहे. मात्र दरड काढण्यास पाच ते सहा तास लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहेत. दरड कोसळल्याने रस्ता बंद झाल्याने चिपळूनकडे येणारी एनडीआरएफ टीम अडकली आहे.Body:पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आंबेनळी घाटात दांभिल गावच्या हद्दीत दरड कोसळली. डोंगरातील दरडीचा मोठा मातीचा ढिगारा हा रस्त्यावर मधोमध पसरला आहे. त्यामुळे महाबळेश्वर व पोलादपूर कडे येणारी जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांनी पोलादपूर येथे शिवाजी चौक येथे बॅरिकेट्स लावून वाहतूक बंद केली आहे.

दरड कोसळण्याची माहिती मिळताच पोलीस व महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जेसीबीच्या सहाय्याने मातीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू आहे. मात्र रस्ता पूर्ववत होण्यास पाच ते सहा तास लागण्याची शक्यता आहे.Conclusion:चिपळूण येथे मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने एनडीआरएफची सातारा येथील टीम बचाव कार्यासाठी निघाली होती. मात्र दरड कोसळून रस्ता बंद झाल्याने एनडीआरएफ पथक अडकून पडले आहे. त्यामुळे चिपळूणच्या बचाव कार्याला उशीर होण्याची शक्यता आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.