रायगड - दहा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला तळोजा पोलिसांनी 24 तासाच्या आत गजाआड केले आहे. इम्तियाज आलमगीर कुवांरी असे (वय 59) आरोपीचे नाव असून पोलिसांनी बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 28 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
अल्पयीन मुलीला आरोपीने स्कुटीवरून पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तेथे उपस्थित असलेल्या काही तरुणांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग केला. आपला पाठलाग केला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीने मुलीला सोडून दिले आणि पळून गेला. अपहरणाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. या संदर्भात मुलीच्या पालकांनी तळोजा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर अगदी काही तासातच सोमवारी (25 नोव्हेंबर) रात्री 9 च्या सुमारास पोलिसांनी आरोपीला अटक केले. तळोजा पोलिसांच्या कामगिरीचे येथील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
हेही वाचा - ओटीपी विचारून आरबीएल बँक क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा