ETV Bharat / state

कर्जत पोलिसांनी वाहन चोराच्या आवळल्या मुसक्या, पावणे चार लाखाची पाच वाहने हस्तगत - कर्जत पोलीस कारवाई

कर्जत पोलीस ठाणे हद्दीमध्ये वाढत्या चोरट्यांवर प्रतिबंध करण्यासाठी 21 मार्च रोजी कर्जत पोलीस ठाणे कर्जत शहरामध्ये पेट्रोलिंग करताना एका वाहन चोरास पकडले आहे. त्याच्याकडून 3 लाख 70 हजार रूपये किंमतीची एकूण 5 वाहने जप्त केली आहेत.

Karjat police arrest vehicle thief five vehicle sized

author img

By

Published : Mar 23, 2021, 8:49 PM IST

रायगड - कर्जत पोलीस ठाणे हद्दीमध्ये वाढत्या चोरट्यांवर प्रतिबंध करण्यासाठी 21 मार्च रोजी कर्जत पोलीस ठाणे कर्जत शहरामध्ये पेट्रोलिंग करत होते. किरवली गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ पेट्रोलिंग करीत असताना एक संशयित रिक्षा नेरळकडून कर्जतकडे येत असल्याचे दिसले. त्यावेळी रिक्षा चालकास थांबवून त्याचेकडे रिक्षाच्या कागदपत्रांची व वाहन चालविण्याच्या परवान्याची मागणी केली. रिक्षाचालकाकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती व तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

तर त्यावेळी पथकाने कार ईन्फोरमेशन अॅपव्दारे सदर अॅटोरिक्षाची माहिती काढली. त्यावेळी त्याने ही रिक्षा चोरल्याचे स्पष्ट झाले. त्याचे नाव संदेश शिवाजी बोराडे ( वय 18 वर्षे, रा.तमनाथ ता.कर्जत) असे आहे. चोरट्याने जवळपास 3 लाख 70 हजार रूपये किंमतीची एकूण 5 वाहने चोरी केल्याचे कबूल केली आहे.

आरोपीने मागील तीन महिन्यांपासून कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथून दोन अॅटोरिक्षा, 2 बुलेट, 1 मोटारसायकल असे जवळपास 3 लाख 70 हजार रूपये किंमतीची एकूण 5 वाहने चोरी करून आणल्याचे तपासात कबुल केले. ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.