रायगड - पनवेल येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक नंदू वाजेकर याच्याकडून छोटा राजन याने मागितलेल्या 26 कोटींची खंडणी प्रकरण केसचा निकाल आज (4 जानेवारी) मुंबई येथील मोक्का न्यायलायत लागण्याची शक्यता आहे. अॅड प्रदीप घरत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आज या खटल्याचा काय निकाल लागणार याकडे लक्ष लागले आहे.
छोटा राजनने मागीतली होती 26 कोटी खंडणी
पनवेल येथील बांधकाम व्यवसायिक नंदू वाजेकर याच्याकडे छोटा राजन याने 2018 साली 26 कोटींची खंडणीची मागणी केली होती. याबाबत नंदू वाजेकर यांनी पनवेल येथे पोलीस ठाण्यात छोटा राजन विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दखल केला होता. हा गुन्हा फोजदारी असल्याने याचा तपास सीबीआय कडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर अलिबाग न्यायलायत याबाबत सुनावणी 2018 साली सुरू झाली होती.
विशेष मोक्का न्यायलायत लागणार आज निकाल
छोटा राजन याच्यावर या प्रकरणात मोक्का लावला असल्याने मुंबई येथे नव्याने तयार झालेल्या विशेष मोक्का न्यायलायत खंडणी प्रकरण खटला सुरू होता. दोन वर्ष या खटल्याची सुनावणी चालू होती. सरकार पक्षातर्फे अड प्रदीप घरत हे या खटल्यात बाजू मांडत आहेत. या खटल्यातील दोन्ही पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आज 4 जानेवारी रोजी विशेष मोक्का न्यायलायत सुनावणी होऊन न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालय या प्रकरणात काय शिक्षा देणार याकडे लक्ष लागले आहे.