ETV Bharat / state

'शासनाची १०० एकर जागा गिळंकृत करण्याचा जेएसडब्ल्यू कंपनीचा डाव' - संजय जांभळे पत्रकार परिषद रायगड बातमी

डोलवी येथील पोलाद निर्मिती करणाऱ्या जेएसडब्ल्यू कंपनीने या परिसरातील शेतकऱ्यांच्या अनेक जागा घेतल्या आहेत. या कंपनीच्या भरावामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भातशेती नापिक झाली आहे. येथील धरमतर खाडी किनारी असणारी कांदळवन सुध्दा या कंपनीने बुजवून टाकले आहेत.

jsw-companys-will-grab-government-land-in-raigad-sanjay-jambhle
माजी सभापती संजय जांभळे
author img

By

Published : Dec 13, 2019, 8:14 AM IST

रायगड- येथील पेण तालुक्यातील जुई-अब्बास हद्दीतील शासनाची १०० एकर जागा गिळंकृत करण्याचा जेएसडब्ल्यू या कंपनीचा डाव आहे, असा आरोप रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी केला आहे. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला आहे.

माजी सभापती संजय जांभळे

हेही वाचा- जनसामान्यांचा पक्ष मूठभरांचा करू नका, पंकजा मुंडेंचा भाजप राज्य नेतृत्त्वाला अप्रत्यक्ष टोला

डोलवी येथील पोलाद निर्मिती करणाऱ्या जेएसडब्ल्यू कंपनीने या परिसरातील शेतकऱ्यांच्या अनेक जागा घेतल्या आहेत. या कंपनीच्या भरावामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भातशेती नापिक झाली आहे. येथील धरमतर खाडी किनारी असणारी कांदळवन सुध्दा या कंपनीने बुजवून टाकले आहेत. खाडी किनारी मातीचा भराव करत जेएसडब्ल्यू कंपनी वाढीव प्लॅन्टसाठी कासू भागातील जुई-अब्बास येथील शासनाच्या ११७ सर्वेनंबरमध्ये असणारी १०० एकर जागा जेएसडब्ल्यू कंपनी गिळंकृत करण्याच्या तयारीत आहे, असा गौप्यस्फोट संजय जांभळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

यातील २५ एकर जागा स्थानिक नागरिक कसत आहेत. मात्र, कंपनी आणि शासनाचे अधिकारी यांच्यात काहीतरी साटेलोटे असून ही जागा कंपनी गिळंकृत करणार असल्याचा डाव आहे. मात्र, शासनाने सदर जागा कंपनीला देऊ नये अन्यथा या भागातील शेतकरी मोठे जनआंदोलन ऊभे केल्याशिवाय राहणार नाही. तसेच कंपनीच्या प्रदूषणाबाबत आपण आवाज उठविला असून याची तक्रार एक महिना अगोदरच प्रदूषण मंडळलासह जिल्हाधिकारी प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे. मात्र, याबाबतचा कोणताही खुलासा आजतागायत आला नसल्याने आपण या सर्वांना न्यायालयात खेचणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जुई-अब्बास येथील सर्वेनंबर ११७ मधील १०० एकर जागा सरकारी खाजण असून या जागेचे सातबारा व फेरफार काढण्याचे काम प्रांताधिकारी यांच्या आदेशानूसार चालू आहे. मात्र, सदर जागेचे सातबारे जेएसडब्ल्यू कंपनीसाठी आहेत का? हे मला माहीत नाही असे तलाठी विना कोरेगावकर यांनी सांगितले.

जुई-अब्बास येथील सरकारी जागा जेएसडब्ल्यू कंपनी घेत नसून, या संदर्भात कोणताही कंपनीशी संबंध नाही. कंपनीकडे भरपूर जागा उपलब्ध आहे, असे आत्माराम बेटकेकर (जनसंपर्क अधिकारी, जेएसडब्ल्यू कंपनी) यांनी सांगितले आहे.

Intro:शासनाची १०० एकर जागा गिळंकृत करण्याचा जेएसडब्ल्यु कंपनीचा डाव

माजी सभापती संजय जांभळे यांचा गौप्यस्फोट

पेण-रायगड

पेण तालुक्यातील जुई-अब्बास हद्दीतील असणारी शासनाची १०० एकर जागा जेएसडब्ल्यु कंपनी गिळंकृत करीत असल्याचा डाव असल्याचा आरोप रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट केला आहे.Body:डोलवी येथील पोलाद निर्मिती करणाऱ्या जेएसडब्ल्यु कंपनीने या परिसरातील शेतकऱ्यांच्या अनेक जागा घेतल्या असून या कंपनीच्या भरावामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भातशेती नापीक झाली असुन येथील धरमतर खाडी किनारी असणारी कांदळवन सुध्दा या कंपनीने बुजवून टाकले आहेत. तर खाडी किनारी मातीचा भराव करत जेएसडब्ल्यु कंपनी वाढीव प्लॅन्ट करीता कासु भागातील जुई- अब्बास येथील शासनाच्या ११७ सर्वेनंबर मध्ये असणाऱ्या १०० एकर जागा सदर जेएसडब्ल्यू कंपनी गिळंकृत करण्याच्या तयारीत असल्याचे गौप्यस्फोट संजय जांभळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगून यातील २५ एकर जागा स्थानिक नागरिक कसत आहेत, मात्र कंपनी आणि शासनाचे अधिकारी यांच्यात काहीतरी साटेलोटे असल्याचा अरोप करीत हि जागा कंपनी गिळंकृत करणार असल्याचा डाव आहे. मात्र शासनाने सदर जागा कंपनीला देऊ नये अन्यथा या भागातील शेतकरी मोठा जनआंदोलन ऊभा केल्या शिवाय राहणार नाही. तसेच कंपनीच्या प्रदूषणाबाबत आपण आवाज उठविला असून याची तक्रार एक महिना अगोदरच प्रदूषण मंडळलासह जिल्हाधिकारी प्रांताधिकारी यांच्याकडे लेखी केली आहे, मात्र याबाबतचा कोणताही खुलासा आजतागायत आला नसल्याने आपण या सर्वांना न्यायालयात खेचणार असल्याचेही त्यांनी सांगितले.Conclusion:जुई अब्बास येथील सर्वे नंबर ११७ मधील १०० एकर जागा सरकारी खाजण असुन या जागेचे सातबारा व फेरफार काढण्याचे काम प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार चालू आहे. मात्र सदर जागेचे सातबारे जेएसडब्ल्यु कंपनीसाठी आहेत का? हे मला माहीत नाही
- विना कोरेगावकर - तलाठी

जुई- अब्बास येथील सरकारी जागा जेएसडब्ल्यु कंपनी घेत नसुन, या संदर्भात कोणताही कंपनीशी संबंध नाही. कंपनीकडे भरपूर जागा उपलब्ध आहे
- आत्माराम बेटकेकर -जनसंपर्क अधिकारी, जेएसडब्ल्यु कंपनी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.