ETV Bharat / state

पत्रकार कशाळकर मारहाण प्रकरणी पत्रकारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा - justice

पत्रकार हर्षद कशाळकर यांना शेकापचे आमदार जयंत पाटील व आमदार पंडित पाटील यांनी मतमोजणी केंद्रात मारहाण केली होती. या प्रकरणी आज जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला असून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.

पत्रकारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा
author img

By

Published : May 27, 2019, 5:40 PM IST

रायगड - पत्रकार हर्षद कशाळकर यांना शेकापचे आमदार जयंत पाटील व आमदार पंडित पाटील यांनी मतमोजणी केंद्रात मारहाण केली होती. या प्रकरणी आज जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. यामध्ये जिल्ह्यातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. आंदोलनकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांना संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

पत्रकार कशाळकर मारहाण प्रकरणी पत्रकारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा

23 मे रोजी अलिबाग मधील नेहुली क्रीडा संकुलमध्ये लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू होती. मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यासाठी निवडणूक आयोगाने ओळखपत्रे दिली होती. ओळखपत्रे असणाऱ्या व्यक्तींनाच आत प्रवेश दिला जात होता. दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास आ. जयंत पाटील, आ. पंडित पाटील यांनी त्यांच्यासोबत ओळखपत्र नसताना मतमोजणी केंद्रात बेकायदेशीर प्रवेश केला.

मतमोजणी केंद्रात आल्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकार हर्षद कशाळकर यांना तुम्ही आमच्या विरोधात बातम्या दिल्या तरी आमची सीट लागली आहे, असे बोलून हर्षद यास कानाखाली मारली. त्यानंतर आ. पंडित पाटील, अभिजित कडवे यांनी हर्षद यास मारहाण केली. या घटनेनंतर अलिबाग पोलीस ठाण्यात आमदाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलिसांनी बेकायदेशीर मतमोजणी केंद्रात प्रवेश केल्याबद्दल चार आमदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

हर्षद कशाळकर यांना झालेल्या मारहाणीबाबत आज ( 27 मे) रोजी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सर्व पत्रकार एकजुट होऊन या निषेध मोर्चात सहभागी झाले होते. निवेदनात मारहाणीचा निषेध, संबंधितांवर कारवाई व मतदान केंद्रात बेकायदेशीर घुसून प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर जलदगतीने कारवाई व्हावी या मागण्या करण्यात आल्या आहेत.

Intro:लोकसत्ताचे पत्रकार हर्षद कशाळकर मारहाणी प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर पत्रकारांचा निषेध मोर्चा

जिल्ह्यातील पत्रकार निषेध मोर्च्यात सहभागी

रायगड : लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी याना शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील यांनी मतमोजणी केंद्रात मारहाण केल्याप्रकरणी आज जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. यावेळी जिल्ह्यातील विविध संघटनांनी या निषेध मोर्च्यात सहभाग घेतला होता. यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.

23 मे रोजी अलिबाग मधील नेहुली क्रीडा संकुलमध्ये लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू होती. यावेळी मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यासाठी निवडणूक आयोगाने ओळखपत्रे दिली होती. ओळखपत्रे असणाऱ्या व्यक्तींनाच यावेळी प्रवेश दिला जात होता. त्यावेळी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास आ. जयंत पाटील, आ. पंडित पाटील इतर व्यक्ती त्याच्यासोबत ओळखपत्र नसताना बेकायदेशीर प्रवेश केला. Body:मतमोजणी केंद्रात आल्यानंतर जयंत पाटील यांनी लोकसत्ताचे पत्रकार हर्षद कशाळकर याना तुम्ही आमच्या विरोधात बातम्या दिल्यात तरी आमची सीट लागली आहे. असे बोलून हर्षद यास कानाखाली मारली. त्यानंतर आ. पंडित पाटील, अभिजित कडवे यांनी हर्षद यास मारहाण केली. या घटनेनंतर अलिबाग पोलीस ठाण्यात आमदारा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलिसांनी बेकायदेशीर मतमोजणी केंद्रात प्रवेश केल्याबद्दल चार आमदारावर गुन्हा दाखल झाला आहे.
Conclusion:हर्षद कशाळकर यांना झालेल्या मारहाणी बाबत आज ( 27 मे) रोजी पत्रकार संघाच्या येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पत्रकार एकजुट होऊन या निषेध मोर्च्यात सहभागी झाले होते. मोर्च्याठिकाणी मान्यवर पत्रकारांनी भाषण करून आपला निषेध व्यक्त केला. त्यानंतर शिष्टमंडळाने जाऊन आपल्या मागण्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांना दिले. निवेदनात मारहाणीचा निषेध, संबंधितांवर कारवाई व मतदान केंद्रात बेकायदेशीर घुसून प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करून जलदगतीने कारवाई व्हावी या मागण्या केल्या आहेत.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.