ETV Bharat / state

कळंबोलीतील 'त्या' बॉम्ब प्रकरणी तपासाचे कौशल्य दाखवणाऱ्या तीन पथकांचा सन्मान - नवी मुंबई गुन्हे शाखा

कळंबोलीतील न्यू सुधागड शाळेजवळ १६ जूनला एक संशयास्पद पेटी आढळून आली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने या पेटीची पडताळणी केली असता, त्यात कमी तीव्रतेचा बॉम्ब सापडला. याप्रकरणी एटीएस आणि नवी मुंबई गुन्हे शाखेकडून कसून तपास करण्यात आला.

तपासाचे कौशल्य दाखवणाऱ्या तीन पथकांचा सन्मान
author img

By

Published : Nov 23, 2019, 8:43 PM IST

रायगड - कळंबोली येथील न्यू सुधागड शाळेजवळ आढळलेल्या बॉम्ब प्रकरणाचा नवी मुंबईच्या विशेष तपास पथकाने सतरा दिवसात छडा लावला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने कमीत-कमी वेळेत तीन जणांना अटक करण्यात आली. या कामाबद्दल नवी मुंबईच्या तीन विशेष पथकांचा पोलीस महासंचालकांकडून गौरव करण्यात आला. पथकांना सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.

तपासाचे कौशल्य दाखवणाऱ्या तीन पथकांचा सन्मान

कळंबोलीतील न्यू सुधागड शाळेजवळ १६ जूनला एक संशयास्पद पेटी आढळून आली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने या पेटीची पडताळणी केली असता, त्यात कमी तीव्रतेचा बॉम्ब सापडला. याप्रकरणी एटीएस आणि नवी मुंबई गुन्हे शाखेकडून कसून तपास करण्यात आला. कोणत्याही दहशतवादी संघटनेशी याचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा- राष्ट्रवादीच्या बैठकीत 50 आमदार उपस्थित; राजकीय घडामोडींना वेग

त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 17 दिवसात या गुन्ह्याची उकल करण्यात नवी मुंबईच्या तीन विशेष पथकांना यश आले. पोलिसांनी सुशील साठे, मनीष भगत, दीपक दांडेकर या आरोपींना अटक केली. या आरोपींचा शोध लावण्यात विजय कादबाने, संदिपान शिंदे या अधिकार्‍यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त कोंडीराम पोपेरे, अजय कुमार लांडगे यांच्यासारखे अनुभवी अधिकारीही या तपास पथकात होते.

हेही वाचा- शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची सर्वोच्च न्यायालयात धाव; शपथविधी घटनाबाह्य असल्याचा आरोप

निवृत्ती कोल्हटकर, शिरिष पवार, राहुल राख, रूपेश नाईक, राजेश गज्जल, सुधिर निकम, विजय चव्हाण, संदीप गायकवाड, भुषण कापडणीस, योगेश वाघमारे, राणी काळे, योगेश देशमुख, नितीन शिंदे हे अधिकारी आणि हेमंत सूर्यवंशी, स्नेहल जगदाळे, मंगल गायकवाड, राजेश सोनवणे, बाबाजी थोरात, अनिल यादव, प्रकाश साळुंखे, उमेश नेवारे, वैभव शिंदे, मनोज चौधरी, उमेश ठाकूर, सचिन टिके या पोलीस कर्मचार्‍यांनी या प्रकरणाच्या तपासात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली.

या प्रकरणात पकडलेल्या आरोपींना एका बिल्डरकडून खंडणी हवी होती. त्यामुळेच बिल्डरच्या घराजवळ हा बॉम्ब पेरण्यात आला असल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांच्या तीन पथकांच्या कामगिरीची दखल पोलीस दलाने घेतली.

Intro:सोबत Av जोडली आहे

पनवेल

नवी मुंबईतल्या कळंबोली येथील न्यू सुधागड शाळेजवळ आढळलेल्या बॉम्ब प्रकरणी नवी मुंबईच्या विशेष तपास पथकाने अवघ्या 17 दिवसात या चॅलेंजिंग प्रकरणाचा छडा लावला. केवळ सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून कमी वेळेत तीन जणांना अटक करत मोठ्या शिताफीने या गुन्ह्याची उकल करण्याची उल्लेखनीय कामगिरी नवी मुंबईच्या विशेष तपास पथकाने केली होती. या कामाबद्दल नवी मुंबईच्या विशेष तीन पथकांचा खुद्द पोलिस महासंचालकांकडून गौरव करण्यात आला. या तपासाबद्दल पथकाला त्यांच्याकडून सहा लाख रूपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. उल्लेखनीय तपासाबाबत पोलिस अधिकाऱ्यांना मिळालेले हे पनवेलमधील पहिलेच बक्षीस ठरले. Body:कळंबोलीतल्या न्यू सुधागड शाळेजवळ १६ जून रोजी एक संशयास्पद पेटी आढळून आली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने या पेटीची पडताळणी केली असता त्यात कमी तीव्रतेचा बॉम्ब आढळून आला होता. त्यामुळे मोठी दहशत माजली होती. याप्रकरणी एटीएस व नवी मुंबई गुन्हे शाखेकडून कसून तपास करण्यात आला. त्यात याचा संबंध कोणत्याही दहशतवादी संघटनेशी नसल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, अवघ्या 17 दिवसात ते ही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्याची उकल करण्यात नवी मुंबईच्या तीन विशेष पथकांना यश आलं आणि याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. यात आरोपींचा शोध लावण्यात विजय कादबाने, संदिपान शिंदे या अधिकार्‍यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त कोंडीराम पोपेरे, अजय कुमार लांडगे यांच्यासारखे अनुभवी अधिकारी या तपास पथकात होते. निवृत्ती कोल्हटकर, शिरिष पवार, राहुल राख, रूपेश नाईक, राजेश गज्जल, सुधिर निकम, विजय चव्हाण, संदीप गायकवाड, भुषण कापडणीस, योगेश वाघमारे, राणी काळे, योगेश देशमुख, नितीन शिंदे हे अधिकारी सोबतीला होतेच. यामध्ये हेमंत सूर्यवंशी, स्नेहल जगदाळे, मंगल गायकवाड, राजेश सोनवणे, बाबाजी थोरात, अनिल यादव, प्रकाश साळुंखे, उमेश नेवारे, वैभव शिंदे, मनोज चौधरी, उमेश ठाकूर, सचिन टिके या पोलीस कर्मचार्‍यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. अथक तपास करून शेवटी पोलिसांनी सुशील साठे, मनीष भगत, दीपक दांडेकर या आरोपींना अटक केली.Conclusion:एका बिल्डरकडून या दोघांना खंडणी हवी होती. त्यामुळेच बिल्डरच्या घराजवळ हा बॉम्ब पेरण्यात आला असल्याचं नंतर स्पष्ट झालं. या प्रकरणी दिवस रात्र एक करत गुन्ह्याच्या छडा लावण्यात स्वतःला वाहून देणाऱ्या तीन पोलिसांच्या पथकांच्या कामगिरीची दाखल पोलीस दलाने घेतली आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या पोलिसांच्या पथकांना पोलीस महासंचालकांनी सहा लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.