ETV Bharat / state

Husband Killed Wife In Matheran : माथेरान येथे 'त्या' शीर नसलेल्या महिलेची ओळख पटली; पतीच निघाला मारेकरी

शनिवारी ११ डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास एक तरुणी आणि तरुण हे माथेरान येथे फिरायला आले होते. त्यावेळेस, त्यांनी इंदिरानगर येथील एका घरातील खोलीमध्ये वास्तव्य करीत रुबिना बेन आणि अमजद खान, असं खोटं नाव सांगून अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचे नमुद केल होत. दरम्यान, रविवारी सकाळी त्यांच्या खोलीचे दार उघडे असल्याने साफ सफाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला खोलीतील दिवाणाखाली महिलेचा शिर नसलेला विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून ( Husband Killed Wife In Matheran ) आला होता. या हत्येचा पोलिसांनी उलघडला झाला आहे.

Husband Killed Wife In Matheran
माथेरान येथे 'त्या' शीर नसलेल्या महिलेची ओळख पटली
author img

By

Published : Dec 14, 2021, 1:18 PM IST

Updated : Dec 16, 2021, 3:00 PM IST

रायगड - माथेरानमध्ये एका खोलीत महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळल्यामुळे मोठी खळबळ माजली होती, पण या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. परंतु, आता या महिलेची ओळख पटली असून मुंबईतील गोरेगाव येथील पुनम पाल या महिलेची हत्या झाली असल्याचे उघड झाले आहे. तर हत्या करणाऱ्या संशयित ( Husband Killed Wife In Matheran ) आरोपीला रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रतिक्रिया

आढळला होता विवस्त्र अवस्थेत मृतदेह -

शनिवारी ११ डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास एक तरुणी आणि तरुण हे माथेरान येथे फिरायला आले होते. त्यावेळेस, त्यांनी इंदिरानगर येथील एका घरातील खोलीमध्ये वास्तव्य करीत रुबिना बेन आणि अमजद खान, असं खोटं नाव सांगून अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचे नमुद केल होत. दरम्यान, रविवारी सकाळी त्यांच्या खोलीचे दार उघडे असल्याने साफ सफाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला खोलीतील दिवाणाखाली महिलेचा शिर नसलेला विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती त्यानं पोलिसांना देताच तात्काळ घटनास्थळी जाऊन पोलीसांनी पंचनामा केला.

सापडली होती एक बॅग -

तर त्यावेळी या मृतदेहाचं डोकं कापण्यात आल्याचं आढळून आलं होतं. यामुळे, पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवित महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु केलं. तपासा दरम्यान, घटनास्थळापासून काही फुटांच्या अंतरावर झुडपामध्ये एक बॅग आढळून आली होती. त्यामध्ये दवाखान्याच्या एका चिठ्ठीवर मुंबईतील गोरेगाव येथील पत्ता आढळून आला होता.

नवऱ्याला पनवेलमधून घेतले ताब्यात -

माथेरान येथील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने महिला आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाचा फोटोही मिळवण्यात पोलीसांना यश आले. यावरून, पोलीसांनी मुंबईतील गोरेगाव येथील पोलीस ठाण्यामध्ये चौकशी केली असता पुनम पाल ही महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचं निष्पन्न झालं. पुढील तपास केला असता पुनम पाल ही तरुणी नवऱ्याला भेटण्यासाठी गेली असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने तपास केला असता माथेरान येथे हत्या करण्यात आलेल्या तरुणीसोबत असलेला तरुण हा तिचा नवरा असल्याचं निष्पन्न झालं होतं. यावरून, पुनम पाल हिच्या नवऱ्याचा शोध घेतला असता त्याला पनवेल येथून ताब्यात घेण्यात आलं आहे.

पाच पथके तयार करून केला तपास -

दरम्यान, गेल्या सात महिन्यांपूर्वी मे 2021 मध्ये लग्न झालेल्या पुनम पाल हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या करण्यात आली असल्याची शक्यता पोलिसी सुत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. तर आरोपी पतीकडून पत्नीच्या मृतदेहाचे कापलेले शीर मिळवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न रायगड पोलीस करत आहे. तर, माथेरान येथे हत्या करण्यात आलेल्या पूनम पाल हिच्या हत्येच्या तपासासाठी रायगड पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली होती.

पाच लाख हुंडा देऊन आणखी पैशाची मागणी -

म्रुत महिलेचा भाऊ रमेश पाल याने माध्यमांना माहिती देताना सांगितले की, पुनम पाल हिच्या पतीच्या घरच्यांनी लग्नात साडे पाच लाख हुंडा घेऊन सुद्धा आणखी पैशाची मागणी सासरकडुन चालली होती. तसेच जिजाजी, सासु, सारसे व नणंद हे या अगोदर दोन वेळा माथेरानमध्ये येऊन गेलेत व सर्वांनी पुर्व तयारी करुनच आपल्या बहिणीचा खून केला.

हेही वाचा - माथेरानमध्ये महिलेचा शिर कापलेला मृतदेह आढळला

Last Updated : Dec 16, 2021, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.