ETV Bharat / state

राज्यात सर्वाधिक मतदार पनवेलमध्ये; अवघ्या पाच महिन्यात वाढले 15 हजार मतदार - पनवेल विधानसभा

लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यातच पनवेल शहरात 15 हजार मतदार वाढले आहेत. या पाच महिन्यात अनेक नव मतदारांनी ऑनलाइन आणि ऑफलाइनद्वारे नाव नोंदणी केल्याचे आढळून आले असून विधानसभा निवडणूक 2019 मध्ये राज्यात पनवेलमधील मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.

राज्यात सर्वाधिक मतदार पनवेलमध्ये
author img

By

Published : Oct 5, 2019, 11:42 AM IST

पनवेल - विधानसभा मतदारसंघात ग्रामीण आणि शहर असे दोन विभाग पडतात. या दोन्ही विभागात लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. 2009 ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पनवेलमधील मतदारांची संख्या 2 लाख 58 हजार इतकी होती. त्यानंतर 2014 ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या संख्येत भर पडली आणि ती 4 लाख 16 हजार इतकी झाली. मतदारांच्या आणखी वाढ होऊन ती काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा 2019 मध्ये पाच लाख ३९ हजार १७८ इतकी झाली.

प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यातच मतदारांच्या आकडेवारीत 15 हजार मतदारांची आणखी वाढ झाली आणि विधानसभा निवडणूक 2019 मध्ये राज्यात सर्वाधिक मतदारांची संख्या असलेले शहर ठरले. सर्वाधिक मतदारांची संख्या असलेल्या पनवेल विधानसभा मतदारसंघात एकूण 5 लाख 54 हजार 827 इतके मतदार आहेत.

हेही वाचा... लातूरच्या तरुणाईचा सरकारकडून अपेक्षाभंग; बेरोजगारी, शैक्षणिक समस्या आजही कायम

त्यामुळे राज्यात होणाऱ्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पनवेलमधील मतदारांचे मत निर्णायक ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पनवेलमधील मतदारसंघातील विविध प्राधिकरणांकडून जनजागृतीसाठी मोहीमा राबवल्या गेल्या. त्याचबरोबर स्वाक्षरी मोहीम, बॅनर, होर्डिंग्ज, पथनाट्ये, सायकल रॅली, चुनाव पाठशाला आदी उपक्रम देखील राबवण्यात आले होते, त्याचाच परिणाम म्हणून आणखी 15 हजार मतदार वाढवण्यात यश मिळाले, असे दत्तात्रय नवले म्हणाले.

हेही वाचा... सगळा अट्टहास 'आरे'मध्येच का? जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल

पनवेल मधील सर्वाधिक मतदारांची संख्या पाहता येत्या विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 576 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे तर निवडणूक प्रक्रियेसाठी अंदाजे ६५० ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मशीन्स वापरल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली. मतदारसंघातील मतदारांची नोंदणी लक्षणीय आह,. मात्र हे नोंदणी केलेले मतदार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कुठे जातात. सुशिक्षितांच्या शहरातील मतदार आपल्या लौकिकास साजेसे वर्तन का करीत नाहीत, हाच खरा प्रश्न आहे.

हेही वाचा... मुख्यमंत्र्यांकडे 10 कोटींची संपत्ती, 2014 च्या तुलनेत दुप्पटीने वाढ​​​​​​​

Intro:पनवेल

सोबत फाईल फुटेज जोडले आहेत

लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यातच पनवेल शहरात 15 हजार मतदार वाढले आहेत. या पाच महिन्यात अनेक नव मतदारांनी ऑनलाइन आणि ऑफलाइनद्वारे नाव नोंदणी केल्याचं आढळून आलं असून विधानसभा निवडणूक 2019 मध्ये राज्यात पनवेलमधील मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.
Body:पनवेल विधानसभा मतदारसंघात ग्रामीण आणि शहर असे दोन विभाग पडतात.या दोन्ही विभागता लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. 2009 ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पनवेलमधील मतदारांची संख्या 2 लाख 58 हजार इतकी होती. त्यानंतर 2014 ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या संख्येत भर पडली आणि ती 4 लाख 16 हजार इतकी झाली. मतदारांच्या आणखी वाढ होऊन ती काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा 2019 मध्ये पाच लाख ३९ हजार १७८ इतकी झाली.

प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यातच मतदारांच्या आकडेवारीत 15 हजार मतदारांची आणखी वाढ झाली आणि विधानसभा निवडणूक 2019 मध्ये राज्यात सर्वाधिक मतदारांची संख्या असलेले शहर ठरले. सर्वाधिक मतदारांची संख्या असलेल्या पनवेल विधानसभा मतदारसंघात एकूण 5 लाख 54 हजार 827 इतके मतदार आहेत.

त्यामुळे राज्यात होणाऱ्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पनवेलमधील मतदारांचं मत निर्णायक ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पनवेल मधील मतदारसंघातील विविध प्राधिकरणांकडून जनजागृतीसाठी मोहीमा राबवल्या गेल्या. त्याचबरोबर स्वाक्षरी मोहीम, बॅनर, होर्डिंग्ज, पथनाट्ये, सायकल रॅली, चुनाव पाठशाला आदी उपक्रम देखील राबवण्यात आले होते, त्याचाच परिणाम म्हणून आणखी 15 हजार मतदार वाढवण्यात यश मिळाले, असं दत्तात्रय नवले म्हणाले.

पनवेल मधील सर्वाधिक मतदारांची संख्या पाहता येत्या विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 576 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे तर निवडणूक प्रक्रियेसाठी अंदाजे ६५० ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मशीन्स वापरल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली.Conclusion:मतदारसंघातील मतदारांची नोंदणी लक्षणीय आहे. मात्र हे नोंदणी केलेले मतदार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कुठे जातात. सुशिक्षितांच्या शहरातील मतदार आपल्या लौकिकास साजेसे वर्तन का करीत नाहीत, हाच प्रश्न आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.