ETV Bharat / state

रायगडात मुसळधार, हवामान विभागाकडून 48 तासात अतिवृष्टीचा इशारा - raigad

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस गायब झाला होता. त्यामुळे रायगडकर उन्हाच्या झळांनी घामाघूम झाले होते. आज मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने सुरुवात केल्याने रायगडकर पावसात न्हाऊन गेले आहेत. तर मुसळधार पावसाने अनेक भागात पावसाचे पाणी साचले होते.

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस
author img

By

Published : Jul 24, 2019, 3:16 PM IST

रायगड - पावसाने जिल्ह्यात आठ दिवस उसंत घेतल्यानंतर आज मध्यरात्रीपासून मुसळधार सुरुवात केली. येत्या 48 तासात जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जिल्ह्यात आज (24 जुलै) एकूण 1728.40 मिमी पाऊस पडला असून सरासरी 107.90 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रोहा तालुक्यात सर्वाधिक 290 मिमी पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाने नदीने धोक्याची पातळी ओलांडली नसली तरीही नदीकिनारी व समुद्र किनारी गावांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस गायब झाला होता. त्यामुळे रायगडकर उन्हाच्या झळांनी घामाघूम झाले होते. आज मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने सुरुवात केल्याने रायगडकर पावसात न्हाऊन गेले आहेत. तर मुसळधार पावसाने अनेक भागात पावसाचे पाणी साचले होते.

पावसामुळे जिल्ह्यातील नद्याही तुडूंब भरून वाहू लागल्या आहेत. सध्या नदीचे पाणी धोक्याच्या पातळी खालून वाहत आहे. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास अंबा, सावित्री, कुंडलिका नद्या धोक्याची पातळी ओलांडून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर आज समुद्रात साडेचार वाजण्याच्या सुमारास उंच लाटा उसळणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून नदीकिनारी व समुद्र किनाऱ्यांवरील गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आज 24 जुलै रोजी अलिबाग 80 मिमी, पेण 140 मिमी, मुरूड 68 मिमी, पनवेल 98.20 मिमी, उरण 124 मिमी, कर्जत 10.20 मिमी, खालापूर 22 मिमी, माणगाव 193.20 मिमी, रोहा 290 मिमी, सुधागड 77 मिमी, तळा 211 मिमी, महाड 95 मिमी, पोलादपूर 94 मिमी, म्हसळा 133 मिमी, श्रीवर्धन 60 मिमी, माथेरान 31 मिमी पावसाची नोंद झाली.

Intro:जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात

48 तासात अतिवृष्टीचा दिला हवामान विभागाने इशारा

जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश

रायगड : आठ दिवस पावसाने जिल्ह्यात उसंत घेतल्यानंतर आज मध्यरात्रीपासून पावसाने मुसळधार सुरुवात केली आहे. येत्या 48 तासात जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जिल्ह्यात आज 24 जुलै रोजी एकूण 1728.40 मिमी पाऊस पडला असून सरासरी 107.90 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रोहा तालुक्यात सर्वाधिक 290 मिमी पाऊस पडला आहे. मुसळधार पावसाने नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली नसली तरी नदीकिनारी व समुद्र किनारी गावांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Body:जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पाऊस गायब झाला होता. त्यामुळे रायगडकर उन्हाच्या छळानी घामाघूम झाले होते. आज मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने सुरुवात केल्याने रायगडकर पावसात न्हाऊन गेले आहेत. तर मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले होते.

पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांही तुडूंब भरून वाहू लागल्या आहेत. सध्या नदीचे पाणी हे धोका पातळीच्या खालून वाहत आहे. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास अंबा, सावित्री, कुंडलिका नद्या आपली धोका पातळी ओलांडून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर आज समुद्रात साडेचार वाजण्याच्या सुमारास उंच लाटा उसळणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून नदीकिनारी व समुद्रकिनारी गावांना सतर्क राहण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.

Conclusion:आज 24 जुलै रोजी अलिबाग 80 मिमी, पेण 140 मिमी, मुरुड 68 मिमी, पनवेल 98.20 मिमी, उरण 124 मिमी, कर्जत 10.20 मिमी, खालापूर 22 मिमी, माणगाव 193.20 मिमी, रोहा 290 मिमी, सुधागड 77 मिमी, तळा 211 मिमी, महाड 95 मिमी, पोलादपूर 94 मिमी, म्हसळा 133 मिमी, श्रीवर्धन 60 मिमी, माथेरान 31 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.