रायगड - उरणच्या 7 वर्षीय हर्षिती भोईरने ठाणे जिल्ह्यातला सर्वात कठीण मानला जाणारा वजीर सुळका सर केला आहे. शिव अभ्यासक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली म्हणून हर्षितीने हे साहस केले आहे. वडील कविराज भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षितीने आजवर अनेक गड सर केले आहेत.
हेही वाचा - Raigad : खारेपाट पाणी योजनेसाठी शेकापचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा
वयाच्या पाचव्या वर्षी वर्ल्ड रेकोर्डमध्ये पहिली नोंद
वयाच्या पाचव्या वर्षी हर्षितीने 12 तासांत 5 गड सर करण्याचा विक्रम करून त्याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकोर्ड, एशिया बुक ऑफ रेकोर्ड आणी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आहे. तर, हिमाचलमधील फ्रेंडशीप पीक सर करण्याचा तिने प्रयत्न केला आहे. यावेळी तिने 15 हजार 300 फुटांचा बर्फातील ट्रेक करून सर्वांची मने जिंकली होती. तसेच, तिने राज्यातील कठीण मानल्या जाणारे कालावंतीण गड, सैलबैला क्लाइम्ब, भैरवगड, गोरख गड हे देखील सर करून, सर्वांना चकित केले आहे. वजीर सुळका सर करणारी ती सर्वात लहान मुलगी ठरली असून, तिच्या या साहसी विक्रमाला एसएल अडव्हेचर ग्रुप पुणे यांच्या लहू उघडे व त्यांचे सहकारी यांची उत्तम साथ मिळाली. तिच्या या साहासाबद्दल सर्व थरातून कौतुक केले जात आहे.
हर्षितीचे साहस पाहून आश्चर्य वाटते
हर्षितीला गड किल्ल्यांची आवड असून, तिने केलेल्या साहसी मोहिमांची यादी पाहिली तर आश्चर्य होते. अशा चिमुरडीने सर्वात कठीण मानला जाणारा वजीर सुळका सर करून शिवाभ्यासक बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली वाहणे हे एक धाडसी साहसच म्हणावे लागेल.
हेही वाचा - लाच घेतल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल - सुषमा सोनावणे