ETV Bharat / state

रायगडच्या खोपोलीत 'स्त्रीरोग आणि स्तनाचा - गर्भशयाचा कॅन्सर' निदान उपचार शिबिर संपन्न - स्तनाचा कॅन्सर

खोपोलीतील सुप्रसिद्ध महिला रुग्णालयात महिला दिनाच्या सप्ताह निमित्ताने स्त्रीरोग आणि स्तनाचा, गर्भशयाचा कॅन्सर निदान उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शहर आणि ग्रामीण भागातील 110 महिलांनी सहभाग नोंदवत उपचार घेतले.

gynecology-and-breast-cancer-cervical-cancer-diagnosis-treatment-camp-at-khopoli-raigad
रायगड
author img

By

Published : Mar 18, 2021, 3:39 PM IST

रायगड - कुटुंबातील सदस्यांची सेवा करत असताना बहुसंख्य महिला आपल्या शरीराची काळजी घेत नाहीत. त्यामुळे चाळीशीनंतर वेळ निघून गेल्यावर अनेक दिर्घ आजारांना सामोरे जावे लागते. ही गंभीर समस्या लक्षात घेत खोपोलीतील सुप्रसिद्ध महिला रुग्णालयात महिला दिनाच्या सप्ताह निमित्ताने स्त्रीरोग आणि स्तनाचा, गर्भशयाचा कॅन्सर निदान उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शहर आणि ग्रामीण भागातील 110 महिलांनी सहभाग नोंदवत उपचार घेतले.

कॅन्सरबाबत महिलांशी तज्ज्ञांनी केली चर्चा -
या शिबिरात शहर आणि ग्रामीण भागातील 110 महिलांनी सहभाग नोंदवत उपचार घेतले असून स्त्रीरोग शिबिरात इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल आळंदी (पुणे) कर्करोग तज्ञ डॉ.समीर कोकणे, सह्याद्री हॉस्पिटल पुणे कर्करोग तज्ञ डॉ. श्रीराम इमानदार, जनरल सर्जन डॉ.अजय परांजपे, डॉ. हर्षद नेरकर भूल तज्ञ, स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ञ डॉ.चारूशिला नेरकर यांनी महिलांची तपासणी करून महिलांना होणाऱ्या आजाराबाबत चर्चा करून तपासणी केली आहे.

शिबिराचे आयोजनकर्त्या स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ञ डॉ. चारूशिला नेरकर यांची प्रतिक्रिया...

प्रामुख्याने महिला कुटुंबाचे संगोपन करताना स्वतः तसेच घरचे लोक दुर्लक्षित करतात, त्यामुळे वेळेत उपचार मिळाले नाहीत आणि भविष्यात अनेक आडचणींना सामोरे जावे लागते. त्यातच टाळेबंदीमुळे अनेक महिला आर्थिक अडचणीत असल्यामुळे महिलांसाठी स्त्रीरोग आणि स्तनाचा, गर्भशयाचा कँन्सर निदान उपचार शिबिराचे आयोजन केले, अशी माहिती स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ञ डॉ. चारूशिला नेरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

हेही वाचा - 'आयडॉल'चा सुवर्णमहोत्सवी पदवीदान समारंभ; उदय सामंत यांची उपस्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.