ETV Bharat / state

गुहागर ते बोरीवली महामंडळाची बस उतरली खड्ड्यात; प्रवाशी किरकोळ जखमी - रायगड

ग्रामदैवत श्रीकाळ भैरवनाथ मंदिराच्या कमानी जवळ खोदकाम केले आहे. या ठिकाणावरुन सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास गुहागर ते बोरिवली (एमएच 14 बीटी 2998) ही बस निघाली होती. तेव्हा अचानक ही बस खोदलेल्या खड्ड्यात उतरली.

महामंडळाची बस खड्ड्यात कलंडली...
author img

By

Published : May 15, 2019, 11:28 PM IST

रायगड - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी पोलादपूर शहरातील श्रीकाळ भैरवनाथ मंदिराच्या कमानीजवळ खोदकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांची बस खोदलेल्या खड्डयात उतरली. ही घटना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली असून या अपघातात प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.

महामंडळाची बस खड्ड्यात कलंडली...

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असताना ठेकेदार कंपनी लार्सन ऍण्ड टूब्रोने शहरातील ग्रामदैवत श्रीकाळ भैरवनाथ मंदिराच्या कमानी जवळ खोदकाम केले आहे. या ठिकाणावरुन सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास गुहागर ते बोरिवली (एमएच 14 बीटी 2998) ही बस निघाली होती. तेव्हा अचानक ही बस खोदलेल्या खड्ड्यात उतरली. या अपघातात प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघाताचे वृत्त कळताच सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश पवार, पोलीस नाईक राज पवार तसेच कर्मचारी आणि पोलादपूरचे नगरसेवक उमेश पवार आणि सहकारी यांनी तातडीने प्रवाशांना अन्य वाहनात बसवण्यासाठी सहकार्य केले. अलिकडेच, ठेकेदार कंपनीने साईडपट्टी उकरून चौपदरीकरणासाठी पोलादपूर शहराच्या पश्चिम दिशेला कामास सुरूवात केली आहे. याठिकाणी सावधतेचे कोणतेही इशारे देणारे फलक लावले नसल्याचे दिसून येत आहे.

Intro:पोलादपूरमध्ये एलऍण्डटीने खोदलेल्या चरात गुहागर ते बोरीवली एस.टी.बस कलंडली

सुदैवाने सर्व प्रवासी बचावले

रायगड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गुहागर आगाराची गुहागर ते बोरीवली एस.टी.बस पोलादपूर शहरातील ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ मंदिराच्या कमानीजवळ एलऍण्डटीने खोदलेल्या चरात कलंडली. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असताना ठेकेदार कंपनी लार्सन ऍण्ड टूब्रोने शहरातील ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ मंदिराच्या कमानीजवळ खोदकाम करून खणलेल्या चरांमुळे महामार्गाची साईडपट्टी अरूंद झाली आहे. मंदिरालगतच रयत शिक्षण संस्थेचे विद्यामंदिर पोलादपूर असल्याने याठिकाणी रम्बलर स्ट्रीप्सचे गतिरोधकही आहेत. याठिकाणी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास गुहागर ते बोरीवली एस.टी.बस (क्रमांक एमएच 14 बीटी 2998) साईडपट्टी नसलेल्या ठिकाणी एलऍण्डटीने खोदलेल्या चरात कलंडली.Body:अकरा वाजता पोलादपूर स्थानकात आलेली ही बस स्थानकातील प्रवासी घेऊन निघाली असता चालक नागरे हे बस चालवित होते. यावेळी नव्याने बसलेल्या प्रवाशांची तिकीटे काढण्याचे काम वाहकांकडून सुरू असताना हा अपघात झाल्याने प्रवाशांना हातापायांसह तोंडाला खांद्याला मुका मार बसल्याचे दिसून आले.Conclusion:या अपघाताचे वृत्त कळताच सहायक पोलीस निरिक्षक प्रकाश पवार, पोलीस नाईक राज पवार तसेच कर्मचारी आणि पोलादपूरचे नगरसेवक उमेश पवार आणि सहकारी यांनी तातडीने प्रवाशांना अन्य वाहनात बसविण्यास सहकार्य केले. अलिकडेच, साईडपट्टी उकरून चौपदरीकरणासाठी लार्सन ऍण्ड टूब्रो या ठेकेदार कंपनीने पोलादपूर शहराच्या पश्चिम दिशेला कामास सुरूवात केली असून सावधतेचे कोणतेही इशारे देणारे फलक या भागात लावले नसल्याने वाहनचालक गाफिल राहात असल्याचे दिसून आले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.