ETV Bharat / state

ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन; रायगडचे ग्रामसेवकही सहभागी - gramsevak strike

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील ग्रामसेवकांनी असहकार व कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे. जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी जिल्हा परिषदेसमोर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.

ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन
author img

By

Published : Aug 13, 2019, 7:32 PM IST

रायगड - विविध मागण्यांसाठी राज्यातील ग्रामसेवकांनी असहकार व कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ग्रामसेवक देखील सहभागी झाले आहेत. आज (मंगळवार) जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी जिल्हा परिषदेसमोर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.

ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन
आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यातील ग्रामसेवकांनी 9 ऑगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. राज्याच्या विविध भागात 9 ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आज या आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करावे, ग्रामसेवक संवर्गास प्रवास भत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करवा, राज्यभर ग्रामविकास अधिकारी सजे व पदे वाढवावे, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकरी वेतनत्रुटी दूर कराव्यात, एक गाव एक ग्रामसेवक निर्मिती करावी, ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे कमी करावीत, या मागण्यासांठी हे असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. अशावेळी ग्रामसेवकांनी सरकारला सहकार्य करायला हवे. या आपत्तीच्या काळात ग्रामसेवकांचे काम महत्त्वाचे असताना ग्रामसेकांनी असहकार आंदोलन सुरू केल्यामुळे याबाबत ग्रामीण भागातील जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

Intro:

ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन

जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे  

अतिवृष्टीची नैसर्गिक आपत्ती असताना ग्रामसेवकांचे आंदोलन, जनतेमध्ये नाराजी

रायगड : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील ग्रामसेवकांनी असहकार व कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यात रायगड जिल्ह्यातील ग्रामसेवक देखील सहभागी झाले आहेत. आज रायगड जिल्ह्यातील ग्रामसेवकानी रायगड जिल्हा परिषदेसमोर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. मात्र राज्यात अतिवृष्टीने नैसर्गिक आपत्ती आली असताना ग्रामसेवकांचे हे आंदोलन कितीपत योग्य आहे याचा विचार ग्रामसेवक संघटनेनी करणे गरजेचे होते.Body:आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यातील ग्रामसेवकांनी 9 ऑगस्ट पासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. 9 ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आज या आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे. आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करावे. ग्रामसेवक संवर्गास प्रवसाभत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करणे, राज्यभर ग्रामविकास अधिकरी सजे व पदे वाढविणे, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकरी वेतनत्रुटी दूर कराव्यात. एक गाव एक ग्रामसेवक निर्मिती करावी. ग्रामसेवकां कडील अतिरिक्त कामे कमी करावीत, आदी मागण्यासांठी हे असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे.Conclusion:ग्रामसेवकांच्या आदोलनामुळे नाराजी

राज्यात अतिवृष्टीमुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. शेकाडो लोकांचे बळी गेले आहे. अशावेळी ग्रामसेवकांनी सरकारला सहकार्य करायला हवे. या आपत्तीच्या काळात ग्रामसेवकांचे काम महत्वाचे असताना ग्रामसेकांनी असहकार आंदोलन सुरू केल असल्यामुळे या आंदोलनाबात ग्रामीण भागातील जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.      
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.