रायगड : सीमा शुल्क विभागात अधिक्षक पदावर काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने जेएनपीटी बंदराच्या जेटीवरून समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दि. ३ मे रोजी घडली. बिनोय नायर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी मानसिक दडपणामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जेएनपीटी प्रवासी जेट्टीवरील कामगारांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत न्हावा शेवा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.