ETV Bharat / state

जेएनपीटीमध्ये वाहतूकदारांचा संप यशस्वी; नवी मुंबई अन् रायगडमध्ये वाहतूककोंडी

अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघ आणि जेएनपीटी वाहतूकदार बचाव समन्वय समितीच्या वाहतूकदारांनी पुकारलेला संप यशस्वी ठरला. संपाचा सर्वात जास्त फटका नवी मुंबई आणि रायगडमधील लघुउद्योगांना बसला.

जेएनपीटीमध्ये वाहतूकदारांचा संप यशस्वी; नवी मुंबई अन् रायगडमध्ये वाहतूककोंडी
author img

By

Published : Oct 5, 2019, 8:37 PM IST

रायगड - जवाहरलाल नेहरू बंदराकडे (जेएनपीटी) जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. तसेच मालवाहू वाहनांना मुख्य मार्गावर प्रवेश बंदी आणि दंडात्मक कारवाई होत आहे. त्यामुळे नवी मुंबई व रायगडमधील वाहतूक संघटनांच्यावतीने संप पुकारण्यात आला. यामुळे नवी मुंबई आणि रायगडमधील जवळपास २६ हजार ट्रक रस्त्यावर थांबली होती.

जेएनपीटीमध्ये वाहतूकदारांचा संप यशस्वी; नवी मुंबई अन् रायगडमध्ये वाहतूककोंडी

अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघ आणि जेएनपीटी वाहतूकदार बचाव समन्वय समितीच्या वाहतूकदारांनी पुकारलेला संप यशस्वी ठरला. संपाचा सर्वात जास्त फटका नवी मुंबई आणि रायगडमधील लघुउद्योगांना बसला. संपामुळे माल पुरवठा होत नसल्याने लघुउद्योजकांचे करोडेचे नुकसान झाले. जेएनपीटी येथे दररोज साधारण 8000 ते 10,000 एक्सपोट व इम्पोर्ट गाड्या ये जा करतात. त्या पूर्णपणे बंद असल्याने जेएनपीटीचे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते.

ई-चालानमध्ये पारदर्शकता आणून त्यानंतरच कारवाई करण्यात यावी, न्हावा-शेवा पोर्ट परिसरातील सीएफएस व एमटी कंटेनर यार्ड यांच्याकडे स्वत:ची पार्किंग नसल्याने होणारी कारवाई वाहतूकदारांवर न करता संबंधितांवर करावी. संबंधित यार्डला पार्किंग उपलब्ध करून देण्यात यावी. जेएनपीटी प्रशासनाने त्यांच्या परिसरामध्ये वाहनास विनाशुल्क पार्किंगसाठी प्लॉट उपलब्ध करून वाहतूकतळ निर्माण करावेत, अशा प्रमुख मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता.

संपाचा लघुउद्योजकांना फटका -
मालवाहतूकदारांचा संप अद्यापही सुरूच आहे. या संपामुळे औद्योगिक उत्पादनावरही परिणाम होत आहे. जेएनपीटी आणि तळोजा एमआयडीसी परिसरातील कंपन्यांना याचा फटका बसला आहे. आशियातील एकूण समुद्री माल वाहतुकीच्या जवळपास ४० टक्के वाहतूक या बंदरातून होते. मात्र, आजच्या माल वाहतूकदारांच्या संपामुळे कंपन्याचा माल गोदामात पडून आहे.

मालवाहतूक कंपन्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या हमालांचीही त्यामुळे उपासमार सुरू झाली आहे. माल वाहतुकदारांच्या समस्या सरकारने लवकरात लवकर सोडवल्या नाहीतर संपाचे आंदोलनात रुपांतर करू, असा इशारा देखील महाराष्ट्र मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष भरत पोखरकर यांनी दिला आहे.

Intro:पनवेल

सोबत व्हिडीओ आणि बाईट जोडली आहे

१० ते १५ किलोमीटर पट्ट्यात लागलेल्या माल वाहनांच्या रांगा आणि देश-परदेशातून बंदराच्या आतमध्ये तिष्ठत असलेली मालवाहू ट्रक… या प्रकाराची पुनरावृत्ती जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये (जेएनपीटी) झाली आहे. अखिल अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघ आणि जेएनपीटी वाहतूकदार बचाव समन्वय समितीच्या वाहतुकदारांनी आज पुकारलेला संप यशस्वी ठरला. या संपामुळे नवी मुंबई आणि रायगडमधील जवळपास 26 हजार ट्रकची चाके रस्त्यावर थांबली. या संपाचा सर्वात जास्त फटका नवी मुंबई आणि रायगड मधील लघुउद्योगांना बसतोय. वाहतूकदारांच्या संपामुळे तयार मटेरीयल पाठवता येत नसल्याने लघुउद्योजकांना दिवसाला सुमारे करोडोंचं नुकसान होतय.
Body:जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. यामुळे स्थानिक नागरिक, प्रवासी, वाहतूकदार त्रस्त झाले आहेत. तसेच मालवाहू वाहनांना मुख्य मार्गावर प्रवेश बंदी, नो एंट्री, दंडात्मक कारवाई होत असल्याने वाहतूकदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नवी मुंबई व रायगडमधील वाहतूक संघटना एकत्र आल्या असून, अन्यायकारक प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT)
या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या
एक्सपोट व इम्पोर्ट गाड्या साधारण 8000 ते 10,000 ये जा करतात. त्या पूर्णपणे बंद असल्याने JNPT प्रशासकीय कामकाज ठप्प झालेले आहे.
ई-चलानमध्ये पारदर्शकता आणून त्यानंतरच कारवाई करण्यात यावी, न्हावा-शेवा पोर्ट परिसरातील सीएफएस व एमटी कंटेनर यार्ड यांच्याकडे स्वत:ची पार्किंग नसल्याने होणारी कारवाई वाहतूकदारांवर न करता संबंधितांवर करावी. संबंधित यार्डला पार्किंग उपलब्ध करून देण्याची ताकीद देण्यात यावी. जेएनपीटी प्रशासनाने त्यांच्या परिसरामध्ये वाहनांस विनाशुल्क पार्किंगसाठी प्लॉट उपलब्ध करून वाहतूकतळ निर्माण करावेत, अशा प्रमुख मागण्यांसाठी नवी मुंबई आणि रायगडमधील माल वाहतुकदारांनी संप पुकारलेला आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे बेमुदत संप सुरूच ठेऊ, असं महाराष्ट्र मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष भरत पोखरकर यांनी सांगितले.
Conclusion:संपाचा लघुउद्योजकांना फटका
या संपामुळे तयार झालेले जॉब वाहतुकदारांच्या संपामुळे वेळेवर मोठ्या उद्योगांना पाठवता येत नसल्याने लघुउद्योजकांना सध्या करोडो रूपयांचे नुकसान सहन करावं लागतंय.मालवाहतुकदारांचा संप अद्यापही सुरूच आहे. या संपामुळं औद्योगिक उत्पादनावरही परिणाम होतोय. जेएनपीटी आणि
तळोजा एमआयडीसी परीसरातील कंपन्यांना याचा फटका बसलाय. आशियातील एकूण समुद्री माल वाहतुकीच्या जवळपास ४० टक्के वाहतूक या बंदरातून होते. मात्र आजच्या माल वाहतुकदारांच्या संपामुळे कंपन्याचा माल तसाच गोदामात पडून आहे.
मालवाहतुक कंपन्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या हमालांचीही त्यामुळं उपासमार सुरू झालीय. जर माल वाहतुकदारांच्या समस्या सरकारने लवकरात लवकर सोडवल्या नाहीत तर संपाचं रूपांतर आंदोलनात करू, असा इशारा देखील महाराष्ट्र मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष भरत पोखरकर यांनी दिला आहे. आर्थिक मंदीच्या संकटात सापडलेले लघुउद्योगांना आता वाहतुकदारांच्या संपाच्या नवीन प्रश्नाला सामोर जावं लागत आहे.

आमच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही, सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत संप सुरू राहणार आहे.
-भरत पोखरकर,
अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.