ETV Bharat / state

शिवसेनेतर्फे कर्जत व खोपोलीतील रुग्णालयाला मॉनिटर-ऑक्सिजन कंसंट्रेटर भेट

शिवसेनेतर्फे कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला 5 पॅरामिटर असलेले मॉनिटर आणि 2 ऑक्सिजन कंसंट्रेटर भेट देण्यात आले आहेत. तसेच खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयालाही 2 ऑक्सिजन कंसंट्रेटर देण्यात आले आहेत.

कर्जत
कर्जत
author img

By

Published : Jun 4, 2021, 3:37 PM IST

रायगड - कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला 5 पॅरामिटर असलेले मॉनिटर आणि 2 ऑक्सिजन कंसंट्रेटर भेट देण्यात आले आहेत. तसेच खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयालाही 2 ऑक्सिजन कंसंट्रेटर देण्यात आले आहेत. रुग्णांना याचा लाभ होणार असल्याने सर्वानी समाधान व्यक्त केले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या सहकार्याने आणि मावळ मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून हे ऑक्सिजन कंसंट्रेटर भेट देण्यात आले आहेत.

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे

कर्जत तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात 70 रुग्ण कोरोनामुक्त

कर्जत तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात चांगल्या प्रकारची रुग्णसेवा दिली जात आहे. या रुग्णालयाला 5 पॅरामिटर असलेले मॉनिटर आवश्यक होते. कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक यंत्रसामुग्रीची कमतरता जाणवत होती. त्यासाठी खासदार बारणे यांनी पुढाकार घेतला. खासदार बारणे यांच्या हस्ते रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांच्याकडे 5 पॅरामिटर असलेले दोन मॉनिटर आणि दोन ऑक्सिजन कंसंट्रेटर सुपूर्द करण्यात आले. कर्जत उपजिल्हा रुग्णालय ५० बेडचे आहे. ऑक्सिजन पाइपलाइनही आहे. कोरोना काळात येथे ७०हून अधिक रुग्ण चांगले उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत.

'वैद्यकीय उपकरणे कमी पडू न देण्यासाठी मी प्रयत्नशील'

'कोरोना काळात ग्रामीण रुग्णालये नागरिकांसाठी वरदान ठरत आहेत. या रुग्णालयांमध्ये दर्जेदार उपचार केले जातात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. नागरिकांना ग्रामीण रुग्णालयात उपचाराची सुविधा निर्माण झाली. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. ग्रामीण रुग्णालयाला श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशन, शिवसेना पक्ष आणि शिवसेना नेत्यांच्या माध्यमातून वैद्यकीय सामुग्रीची मदत केली जात आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना वैद्यकीय उपकरणाची कमतरता भासू नये, यासाठी मी प्रयत्नशील आहे', असे खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - १० जूनला लागणार वर्षातील पहिले खंडग्रास सूर्यग्रहण; मात्र, सूतक लागणार नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.