ETV Bharat / state

मोटार मॅकेनिक टीमकडून पूरग्रस्तांना अशीही मदत.. पाणी अन् चिखलामुळे बंद पडलेली वाहने निशुल्क करून दिली दुरुस्त - पूरग्रस्त वाहने

खोपोली शहरातील मेकॅनिक शाहिद शेख यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून आपल्या मेकॅनिक मित्रांच्या मदतीने पूरग्रस्त भागात पाणी आणि चिखलामुळे बंद पडलेली वाहने निशुल्क दुरुस्त करून दिली. खोपोलीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि स्पेअरपार्ट दुकानदारांनी त्यांच्या संकल्पनेला हातभार लावला.

Free repair of flood victims' vehicles
Free repair of flood victims' vehicles
author img

By

Published : Aug 1, 2021, 8:24 PM IST

रायगड - कोकण प्रांताची अतिवृष्टी आणि महापुरामुळे दाणदाण उडाली. कोकणवासीयांना बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी अनेकांचे हात पुढे आले. जीवनावश्यक वस्तु आणि साहित्याचा ओघ त्यांचा मदतीसाठी वाहू लागला असता खोपोली शहरातील मेकॅनिक शाहिद शेख याच्या मनात आपणही मदत करायला हवी, ही प्रेरणा जागृत झाली. मात्र आपली आर्थिक परिस्थिती सुमार त्यात आपण मदत ती काय करणार ? अशी शंका उपस्थित होताच त्यांनी आपल्या हाती असलेल्या नादुरुस्त गाड्या दुरुस्त करण्याच्या कलेच्या माध्यमातून मदत करण्याचे त्यांनी ठरवलं. त्यासाठी खोपोली शहरातल्या सर्व मोटर मॅकेनिक मित्रांशी चर्चा केली. पूरग्रस्त भागात पाणी आणि चिखलामुळे बंद पडलेली वाहने निशुल्क दुरुस्त करून देण्याचा सर्वानी संकल्प करून खोपोलीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि स्पेअरपार्ट दुकानदारांनी त्यांच्या संकल्पनेला हातभार लावला.

२० कुशल आणि १५ अकुशल मोटर मॅकेनिक टीमने केल्या असंख्य गाड्या दुरुस्त -

तर साधारणपणे २० कुशल आणि १५ अकुशल मोटर मॅकेनिक व त्याच्या एका मित्राने 'ना नफा ना तोटा' तत्वावर दिलेल्या बसने महाडकडे रवाना झाले. तर महाड शहारात दाखल होताच त्यांनी बस पार्क असून आपली भूमिका त्या ठिकाणी काही लोकांना सांगितली, मात्र त्यांच्या गबाळ्या वेषावरून, हे कसली सेवा देणार ? असा ग्रह करून त्यांना कोणी रिस्पॉन्स दिला नाही.

ऊन वारा झेलत केले निस्वार्थी कार्य -

मात्र जिद्द न हरता त्यांनी प्रयत्न सुरु ठेवले. त्यांची एकंदर तयारी पाहून सुरूवातीला एक दोन मोटारसायकल रिपेअरसाठी त्यांना मिळाल्या आणि त्या त्यांनी अवघ्या काही मिनिटात सुरु करून दिल्या. त्यांच्या या सेवेची चर्चा कानोकान पसरली आणि बघता-बघता गाड्यांची रीघ लागली. दिवसभरत शेकडो वाहने या टीमने दुरुस्त केली. ऊन आणि पावसाचा मारा झेलत उघड्या रिक्षा स्टॅन्डमध्ये हे मॅकेनिक झटून काम करत राहिले. आपल्याकडचे नवे स्पेअर पार्ट लावून, ऑइल बदली करूनही त्याचे पैसे नाकारताना पाहून महाडकर अचंबित झाले होते.

तसेच बुडालेली मोटारसायकल रिपेअरसाठी दोन हजाराचा खर्च अपेक्षित होता म्हणून ती रिपेअर करण्यापेक्षा भंगारात विकायला निघालेल्या व्यक्तीची मोटारसायकल या टीमने दुरुस्त करून दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टीमला मोठे समाधान देऊन गेले होते. काहींच्या गाड्या सोसायटीच्या आवारातून ढकलत आणून त्यांनी रिपेअर करून दिल्या. त्यांच्या प्रयत्नाला स्थानिक मॅकेनिकनी पण सहकार्य केले. कित्येकांनी त्यांच्या सेवेच्या बदल्यात पैसे देऊ केले मात्र त्यांनी स्पष्ट नकार देत आपले औदार्य दाखवले. फक्त मोटार सायकल नव्हे तर कार देखील त्यांनी रिपेअर करून दिल्या.

या सर्व टीमची खाण्या पिण्याची जबाबदारी त्यांच्या सोबत आलेल्या महिला कुटुंबीयांनी घेतली होती. हे मॅकेनिक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पूरग्रस्तांसाठी खोपोली परिसरातून जमा केलेले जे साहित्य आणि धान्य होते ते गरजूंच्या घरी जाऊन वाटले. या टीम मधल्या महिलांनी काही घरात जाऊन घरकामाला हातभार लावला. महाडकर या सर्व प्रकाराने भारावून गेलेले होते. त्यांच्या या योगदानाबद्दल अनेकांनी आभार व्यक्त केले.

या आगळ्या वेगळ्या अभियानावरून परतताना रात्र झाली होती मात्र सर्व टीमच्या चेहऱ्यावरचा उत्साह मात्र सकाळचाच होता. सामाजिक जडणघडणीत आपणही आपल्या परीने समाजासाठी योगदान देऊ शकतो याची जाणीव सर्वांच्या मानात उभारी घेत होती. यापुढेही याच पद्धतीने पुन्हा मदतीला जाण्याचा इरादा त्यांच्या मनात पक्का झाला होता. त्यांच्या या अभूतपूर्व अभियानचे सर्व स्थरावरून कौतुक होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.