ETV Bharat / state

मुंबई-पुणे महामार्गावर दोन अपघात; चार जण जखमी

मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी दोन अपघात झाले. या अपघातात चारजण जखमी झाले आहेत. पहिला अपघात आडोशी टनेलजवळ झाला. तर, दुसरा अपघात बोरघाटात झाला.

accident
अपघात
author img

By

Published : Nov 30, 2020, 12:38 PM IST

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर आजची सकाळ ही अपघाताची ठरली आहे. आडोशी टनेलजवळ दुधाचा टँकर पलटी होऊन अपघात झाला होता. तर बोरघाटात शिग्रोबा मंदिराजवळ कार पलटी होऊन दुसरा अपघात झाला आहे. या अपघातात चारजण जखमी झालेत. एकाला खोपोली नगरपरिषद रुग्णालयात दाखल केले आहे. आडोशी टनेलजवळ झालेल्या अपघातात कोणी जखमी नाही. टँकर बाजूला काढल्याने वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरील अपघाताची दृश्ये
आडोशी टनेलजवळ अपघात, वाहतूक कोंडी -
मुंबई-पुणे महामार्गावर सकाळच्या सुमारास दुधाचा भरलेला टँकर पुण्याकडून मुंबईकडे येत असताना चालकाचे नियंत्रण सुटून पलटी झाला. टँकर हा महामार्गाच्या मधोमध पलटी झाल्याने चार किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. आयआरबी आणि वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त टँकर बाजूला केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. मात्र, प्रवाशांना दीड ते दोन तास वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला होता.
दुसरा अपघात बोरघाटात -
मुंबई-पुणे महामार्गावर सकाळी दुसरा अपघात हा बोरघाटात झाला. मुंबईकडे येणारी भरधाव कार ही शिग्रोबा मंदिराजवळ आल्यानंतर पलटी होऊन बाजूच्या दरीत कोसळली. या कारमधून चारजण प्रवासी
प्रवास करीत होते. हे चौघे जखमी झाले असून एकाला खोपोली नगरपरिषद रुग्णालयात दाखल केले आहे. तिघेजण कमी प्रमाणात जखमी झाले आहेत.

गुरुवारी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू -

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर पनवेल जवळ एसटी बसला मध्यरात्री अपघात झाला. या अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला होता. तर 16 प्रवासी जखमी झाले. अपघातातील मृत व्यक्ती मुंबईत बेस्टचा चालक होता. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सातारा इथून मुंबईकडे निघालेली बस पनवेल बायपासजवळ आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी पुढे चाललेल्या वाहनाला घासत पुढे गेली. या अपघातात बसचा पत्रा कापला गेला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.