ETV Bharat / state

'पनवेल महिला मृत्यूप्रकरण': चार फरार आरोपींनी बेड्या

पनवेल मधील दुंदरे या गावातील शारदा माळी (वय -55) या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, संबंधित मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी चार फरार आरोपींना अटक केली आहे.

panvel crime news
पोलिसांनी चार फरार आरोपींना अटक केली आहे.
author img

By

Published : Feb 8, 2020, 11:20 AM IST

नवी मुंबई - पनवेलमधील दुंदरे गावात मंगळसूत्र चोरल्याचा वाद विकोपाला गेल्यानंतर एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र, पोलिसांनी प्राथमिक तपासात आत्महत्येची नोंद केली. तसेच आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पाच जणांवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

मात्र, संबंधित मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. ते चौघेही फरार होते.

पनवेल मधील दुंदरे या गावातील शारदा माळी (वय -55) या महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र महिलेला मारहाण करून गळफास दिल्याचे नातेवाईकांनी सांगितले होते. तसेच त्यांनी पाच संशयितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. संबंधित संशयित गावातून फरार झाले होते. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी तीन पथके नेमली होती. त्यानुसार, पोलिसांनी हनुमान भगवान पाटील, गोपीनाथ विठ्ठल पाटील तसेच अलका गोपीनाथ पाटील आणि वनाबाई अर्जुन दवणे या चौघांना 17/2020, भा. द. वि. कलम -302, 306, 379, 504, 506, 34 नुसार अटक केली आहे.

Intro:पनवेल मधील महिलेच्या मृत्यूप्रकरणी चार जणांना अटक..
मृत्यूनंतर चारही जण होते फरार..
महिलेच्या कुटूंबियांनी व्यक्त केला होता संशय.…

नवी मुंबई:

पनवेल मधील दुंदरे गावात मंगळसूत्र चोरीला गेल्याचा वाद विकोपाला गेल्यानंतर एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता.मात्र पोलिसांनी प्राथमिक तपासात आत्महत्या अशी नोंद केली होती.
व आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पाच जणांवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.मात्र महिलेचा मृत्यू हा आत्महत्या नसून खून असल्याचा दावा मृत महिलेचे कुटूंबीय करत होते. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी आज सकाळी चार जणांना अटक केले आहे.
पनवेल मधील दूदंरे या गावातील शारदा माळी (55) या महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती, मात्र महिलेला प्रथम जबर मारहाण करून, जाळण्याचा प्रयत्न करून, नंतर फासावर लटकवुन खून केल्याचा आरोप, पाच लोकांवर मृत महिलेच्या कुटूंबियांनी केला होता. महिलेच्या मृत्यु नंतर
महिलेच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या व्यक्ती गावातून फरार होत्या यात दोन पुरुष अल्पवयीन तरूणीसह दोन महिलांचा समावेश होता. यांना शोधण्यासाठी पोलिसांनी तीन पथक नेमले होते. त्यानुसार पोलिसांनी हनुमान भगवान पाटिल, वय (37)गोपीनाथ विठ्ठल पाटील(45)अलका गोपीनाथ पाटील(35)वनाबाई अर्जुन दवणे(65) या चौघांना 17/2020, भा. द. वि. कलम -302, 306, 379, 504, 506, 34 नुसार अटक करण्यात आली आहे.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.