ETV Bharat / state

माणगावात कोरोनाचे पाच नवीन रुग्ण; उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकेचा समावेश

author img

By

Published : Jun 19, 2020, 3:34 PM IST

माणगाव तालुक्यात मुंबई तसेच इतर उपनगरातून हजारो नागरिक दाखल झाले आहेत. मुंबईतून आलेल्या नागरिकांमधून आत्तापर्यंत 62 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाली. सर्वांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षात उपचार सुरू आहेत.

sub-district hospital
उपजिल्हा रुग्णालय

रायगड - माणगाव तालुक्यात आज कोरोनाचे पाच नवीन रूग्ण आढळले. यामध्ये माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या दोन डॉक्टर आणि एका परिचरिकेचा समावेश आहे. माणगावमध्ये आत्तापर्यंत 62 कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून यातील 51 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यात सद्यस्थितीत 11 अॅक्टिव रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

माणगावात आढळले कोरोनाचे पाच नवीन रूग्ण

माणगाव तालुक्यात मुंबई तसेच इतर उपनगरातून हजारो नागरिक दाखल झाले आहेत. मुंबईतून आलेल्या नागरिकांमधून आत्तापर्यंत 62 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाली. सर्वांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, राज्यात काल दिवसअखेर १ हजार ६७२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६० हजार ८३८ झाली आहे. तर कोरोनाच्या ३ हजार ७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले. सध्या राज्यात ५३ हजार ९०१ रुग्णांवर (अ‌ॅक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.