ETV Bharat / state

राज्याभिषेकाच्या जलाने पावन झालेला 'हत्ती तलाव' दीडशे वर्षांमध्ये पहिल्यांदाच भरला.. - हत्ती तलाव माहिती

किल्ले रायगडच्या जतन व संवर्धन कामात हत्ती तलावाची सुशोभीकरण आणि गळती कामे हाती घेण्यात आले. छत्रपती संभाजीराजे यांनी जातीने या कामात लक्ष घालून हत्ती तलावाचे काम पूर्ण केले. त्यांच्या या कामाला यश आले असून यावर्षी पावसात हत्ती तलाव हा पूर्णपणे भरून गेला आहे.

हत्ती तलाव
हत्ती तलाव
author img

By

Published : Jul 12, 2020, 9:27 PM IST

रायगड - किल्ले रायगडावरील सर्वात मोठा असलेला हत्ती तलाव हा दीडशे वर्षानंतर पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने भरला आहे. रायगडासाठी ही आनंदाची बाब आहे. किल्ले रायगडच्या संवर्धनाचे काम हे रायगड प्राधिकरण मार्फत सुरू आहे. या माध्यमातून हत्ती तलावाची गळती, दुरुस्ती आणि डागडुजीचे काम करण्यात आले. त्यानुसार हा तलाव पावसाच्या पाण्याने भरून गेल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

किल्ले रायगडला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी किल्ले रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून किल्याचे जतन आणि संवर्धनाचे काम छत्रपती खासदार संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. किल्ले रायगडावर असलेला हत्ती तलाव, हा सर्वात मोठा तलाव असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात या तलावाचा वापर केला जात होता. मात्र कालांतराने हत्ती तलावाकडे दुर्लक्ष झाल्याने यातील पाणी हे कमी होऊ लागले.

रायगडावरील हत्ती तलाव

हेही वाचा - पावनखिंडीतला थरार जिवंत करणाऱ्या 'जंगजौहर' सिनेमाच पहिलं पोस्टर लाँच

किल्ले रायगडच्या जतन व संवर्धन कामात हत्ती तलावाची सुशोभीकरण आणि गळती कामे हाती घेण्यात आले. छत्रपती संभाजीराजे यांनी जातीने या कामात लक्ष घालून हत्ती तलावाचे काम पूर्ण केले. त्यांच्या या कामाला यश आले असून यावर्षी पावसात हत्ती तलाव हा पूर्णपणे भरून गेला आहे. किल्ले रायगडावरील हा हत्ती तलाव दीडशे वर्षानंतर पूर्णपणे भरला गेल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.

"असे क्षण जीवनात खूप कमी येतात! ज्याचं समाधान आयुष्यभर लाभतं. सर्व शिवभक्तांना सांगताना आनंद होत आहे, की रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून आपण जे काही काम हाती घेतले, त्याला यश येत आहे. हत्ती तलावाचे 80% काम पूर्ण झाले असून तलावाला अजूनही एक जागी गळती आहे. त्या गळतीचा व्यवस्थित अभ्यास करून ती सुद्धा काढून घेतली जाईल." अशी प्रतिक्रिया छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी दिली आहे.

काय आहे हत्ती तलावाचा इतिहास -

६ जून १६७४ ला स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. यावेळी महाराजांच्या अभिषेकासाठी सात प्रमुख नद्यांचे आणि अनेक उपनद्यांचे जल आणण्यात आले होते. राज्याभिषेकाचा सोहळा आटोपल्यावर हे जल किल्ल्यावरील तलावत, म्हणजेच हत्ती तलावात विसर्जीत करण्यात आले. पवित्र जलाने पावन झालेला हा तलाव कधीच आटत नाही, अशी आख्यायिका या तलावाविषयी सांगितली जाते.

हेही वाचा - समुद्रातील गनिमीकाव्याचे जनक कान्होजी आंग्रे यांची जीवनगाथा येणार पडद्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.