रायगड - वातावरणामध्ये होणाऱ्या सततच्या बदलामुळे सततच्या बदलामुळे भुरी, तुडतुड्या रोगाने आंब्याच्या फळबागा ग्रासल्या आहेत. यंदा लांबलेल्या पावसामुळे उशिरा का असेना आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात झाली. मात्र, रोगांचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे फळबागांना फटका बसत आहे. यामुळे आंबा शेतकरी हवालदील झाला आहे.
हेही वाचा -
बदलत्या वातावरणामुळे यंदा आंबा पिकाला फटका बसला आहे. आंबा मोहर येण्यास सुरूवात झाली असताना आता तुडतुड्या आणि भुरी रोगांचे संकट फळबांगावर कोसळले आहे. त्यामुळे आंबा बागाईतदार यांना आर्थिक नुकसान होणार आहे.
जिल्ह्यातील आंबा क्षेत्र -
- आंबा लागवडीखालील क्षेत्र - 42 हजार हेक्टर
- उत्पादनक्षम क्षेत्र - 14 हजार हेक्टर
- दरवर्षी उत्पादन - 21 हजार मेट्रिक टन
- अधिक उत्पादन देणारे तालुके - श्रीवर्धन, म्हसळा, महाड, माणगाव, अलिबाग
आंबा मोहर संरक्षणाची पूर्वतयारी म्हणून नवीन फुटणाऱ्या पालवीवर शेंडा पोखरणारी आळी व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिफारस केलेल्या किटकनाशकांची फवारणी करावी असे अवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.