ETV Bharat / state

दीव शासकीय जमीन घोटाळा : नायब तहसीलदार सिराज तुळवे निलंबित

रोहा तालुक्यातील दिव गावातील 350 एकर शासकीय जमीन घोटाळ्याबाबत सर्वहारा जन आंदोलनने आवाज उठविला होता. दिव गावातील महिला सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना भेटून झालेल्या घोटाळ्याची माहिती दिली होती. या प्रकरणात रोहा नायब तहसीलदार सिराज तुळवे, तलाठी, अधिकारी, दलाल, दुय्यम निबंधक अधिकारी यांनी संगनमत करून शेतकऱ्यांचीही फसवणूक करून गुंतवणूक दारांना शासकीय जमीन विकली. यानंतर नायब तहसीलदार सिराज तुळवे यांच्यावर कोकण आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

दिव शासकीय जमीन
author img

By

Published : Sep 1, 2019, 4:41 PM IST

रायगड - जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील दीव गावच्या शासकीय जमीन घोटाळ्याबाबत नायब तहसीलदार सिराज तुळवे यांच्यावर कोकण आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सिराज तुळवे यांचा निलंबनाचा प्रस्ताव कोकण आयुक्त यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार या प्रकरणाची खोली पाहता कोकण आयुक्त यांनी तुळवे यांना निलंबत केली आहे. त्यामुळे शासकीय जमीन घोटाळा प्रकरण तुळवे यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे. तर या प्रकरणातील दुय्यम निबंधक अधिकारी, दलाल यांच्यावरही टांगती तलवार टांगलेली आहे.

दिव शासकीय जमीन घोटाळा प्रकरणात

हेही वाचा - जळगाव घरकुल घोटाळ्यावरील निकालाबाबत अण्णा हजारेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

रोहा तालुक्यातील दिव गावातील 350 एकर शासकीय जमीन घोटाळ्याबाबत सर्वहारा जन आंदोलनने आवाज उठविला होता. दिव गावातील महिला सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना भेटून झालेल्या घोटाळ्याची माहिती दिली होती. या प्रकरणात रोहा नायब तहसीलदार सिराज तुळवे, तलाठी, अधिकारी, दलाल, दुय्यम निबंधक अधिकारी यांनी संगनमत करून शेतकऱ्यांचीही फसवणूक करून गुंतवणूक दारांना शासकीय जमीन विकली. याबाबत महिला ग्रामस्थ व सर्वहारा जन आंदोलन यांनी आवाज उठविल्याने हे प्रकरण बाहेर आले.

हेही वाचा - कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणी फसवेबाज कंपनीच्या 'त्या' संस्थापकाला अटक

दीव शासकीय जमीन घोटाळ्याबाबत दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याबाबत शेतकऱ्यांच्यावतीने उल्का महाजन यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नायब तहसीलदार सिराज तुळवे यांचा निलंबनाचा प्रस्ताव कोकण आयुक्त यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार कोकण आयुक्तांनी सिराज तुळवे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, यामधील मुख्य दलाल, इतर दलाल, गुंतवणूकदार आणि दुय्यम अधिकारी यांच्यावर कारवाई कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Intro:
दिव शासकीय घोटाळ्यातील नायब तहसीलदार सिराज तुळवे यांच्यावर निलंबनाची कारवाई

जिल्हाधिकारी यांच्या प्रस्तावानुसार कोकण आयुक्त यांनी केली कारवाई

दलाल व दुय्यम निबंधक अधिकारी यांच्यावर कारवाईची टांगती तलवार

रायगड : रोहा तालुक्यातील दीव गावच्या शासकीय जमीन घोटाळाबाबत नायब तहसीलदार सिराज तुळवे यांच्यावर कोकण आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सिराज तुळवे यांचा निलंबनाचा प्रस्ताव कोकण आयुक्त यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार या प्रकरणाची खोली पाहता कोकण आयुक्त यांनी तुळवे यांना निलंबत केली आहे. त्यामुळे शासकीय जमीन घोटाळा प्रकरण तुळवे यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे. तर या प्रकरणातील दुय्यम निबंधक अधिकारी, दलाल यांच्यावरही टांगती तलवार टांगलेली आहे. Body:रोहा तालुक्यातील दिव गावातील 350 एकर शासकीय जमीन घोटाळ्याबाबत सर्वहारा जन आंदोलनने आवाज उठविला होता. दिव गावातील महिला सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना भेटून झालेल्या घोटाळ्याची माहिती दिली होती. या प्रकरणात रोहा नायब तहसीलदार सिराज तुळवे, तलाठी, अधिकारी, दलाल, दुय्यम निबंधक अधिकारी यांनी संगनमत करून शेतकऱ्यांचीही फसवणूक करून गुंतवणूक दारांना शासकीय जमीन विकली. याबाबत महिला ग्रामस्थ व सर्वहारा जन आंदोलन यांनी आवाज उठविल्याने हे प्रकरण बाहेर आले.Conclusion:दिव शासकीय जमीन घोटाळ्याबाबत दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याबाबत शेतकऱ्याच्यावतीने उल्का महाजन यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नायब तहसीलदार सिराज तुळवे यांचा निलंबनाचा प्रस्ताव कोकण आयुक्त यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार कोकण आयुक्तांनी सिराज तुळवे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र यामधील मुख्य दलाल, इतर दलाल, गुंतवणूकदार आणि दुय्यम अधिकारी यांच्यावर कारवाई कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.