रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर डिझेल टँकरला आग लागल्याची घटना आज पहाटे सहा वाजता घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, टँकरची केबिन जळून खाक झाली. बोरघाटात पुणे लेनवर ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
टँकर केबिनला लागली आग -
डिझेल टँकर मुंबई येथून पुण्याकडे येत होता. बोरघाटात टँकर आला असता अचानक केबिनला आग लागली. चालक त्वरित टँकर बाजूला लावून बाहेर पडला. त्यामुळे चालकाचा जीव वाचला. आगीने पेट घेतल्याने केबिन पूर्ण जळून खाक झाली.
अग्निशामक दलाने विझवली आग -
डिझेल टँकरला आग लागल्याची माहिती कळताच अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित आग नियंत्रणात आणली. डिझेल टँकर रिकामा असल्याने पुढील अनर्थ टळला आहे. वाहतूक पोलीससुद्धा घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी प्रयत्न करून वाहतूक सुरळीत केली.