ETV Bharat / state

Bus service closed : पेण तालुक्यातील दादर-भाल-कणे एसटी सेवा बंद - To Help private transport

पेण-रायगड - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर रायगड ( Raigad ) एसटी आगाराने ग्रामीण भागातील एसटी बसेस सुरू केल्या आहेत. मात्र खासगी वाहन चालकांच्या मनमानीमुळे पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील काही बसेस बंद करण्याची वेळ आता रायगड एसटी महामंडळावर आली आहे. खासगी वाहतुकीला खतपाणी घालण्यासाठी ( To Help private transport ) पेण तालुक्यातील दादर, भाल, कणे या महत्वाच्या गावांतील फेऱ्या बंद ( Bus service closed ) ठेवण्याचा निर्णय एसटी मंडळाने घेतला आहे, असा आरोप होत आहे.

Bus service closed
Bus service closed
author img

By

Published : Jun 18, 2022, 7:15 PM IST

पेण-रायगड - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर रायगड ( Raigad ) एसटी आगाराने ग्रामीण भागातील एसटी बसेस सुरू केल्या आहेत. मात्र खासगी वाहन चालकांच्या मनमानीमुळे पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील काही बसेस बंद करण्याची वेळ आता रायगड एसटी महामंडळावर आली आहे. खासगी वाहतुकीला खतपाणी घालण्यासाठी ( To Help private transport ) पेण तालुक्यातील दादर, भाल, कणे या महत्वाच्या गावांतील फेऱ्या बंद ( Bus service closed ) ठेवण्याचा निर्णय एसटी मंडळाने घेतला आहे, असा आरोप होत आहे. तथापि, एसटी कर्मचाऱ्यांना खाजगी वाहन चालकांकडून होणारा त्रास थांबविण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे रायगडच्या एसटी विभाग नियंत्रकांचे म्हणणे आहे.

ग्रामीण भागात लालपरी धाऊ लागल्यानंतर अनेक प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्येक गावात तीन - चार फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, एसटी बस गावामध्ये गेल्यानंतर चालकाला तेथील समाजकटकांकडून होणारा नाहक त्रास, वाहक-चालकाला केली जाणारी शिवीगाळ आणि काही चूक नसताना एसटी चालकाच्या खिशावर पडणारा आर्थिक भार, या सर्व गोष्टींमुळे आता कोणताही एसटी चालक ग्रामीण भागात एसटीची ड्युटी करायला तयार होत नाही. पेण तालुक्यातील दादर, भाल आणि कणे या गावातील कटू अनुभव एसटी चालकाला आले आहेत.

खाजगी चालकांचा त्रास - गावांमध्ये एसटी बस गेल्यानंतर खाजगी चालकाकडून मुद्दामहून गाडी फिरवायला सुद्धा जागा दिली जात नाही. त्याचप्रमाणे आधीच अरूंद जागा आणि तेथे असणाऱ्या इतर खाजगी गाड्या यामुळे गाडी चालवणे देखील त्रासदायक ठरत आहे. त्यांना हटकले असता एसटी चालकाला शिवीगाळ आणि वादाला सामोरे जावे लागत आहे. या वादामध्ये अर्धा ते एक तास जात असल्याने पुढील गावांच्या फेऱ्यांचे वेळापत्रक देखील कोलमडत आहे. परिणामी, त्या पुढील गावातील नागरिकांच्या रोषाला एसटी चालकाला सामोरे जावे लागते. अनेकवेळा अरूंद रस्त्यात खाजगी गाड्या लागलेल्या असल्याने या गाड्यांना धक्का लागला तर या चालकाच्या खिशातून खाजगी गाडी चालकाला पैसे द्यावे लागल्याच्याही घटना घडल्या आहेत. या सर्व त्रासामुळे या भागात कोणताही एसटी ड्राइव्हर गाडीच्या फेऱ्या मारायला तयार नसल्याने अखेर पेण एसटी आगराने दादर, भाल आणि कणे या दोन्ही गावात एसटीच्या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेऊन तशा प्रकारचे पत्र ग्राम पंचायत कार्यालयात पाठवले आहे. खासगी वाहतुकीला खतपाणी घालण्यासाठी पेण तालुक्यातील दादर, भाल, कणे या महत्वाच्या गावांतील फेऱ्या बंद ठेवण्याचा निर्णय एसटी मंडळाने घेतला आहे. या गावांमधील नागरिकांना मात्र हा निर्णय काही रुचलेला नाही.

विद्यार्थी वर्गाला फटका - भागातील एसटी बसेसचा सर्वाधिक फायदा हा ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी वर्ग आणि पासधारक नोकरवर्गाला होत असतो. मात्र मागील काही दिवसांपूर्वी दादर, भाल आणि कणे गावातील एसटी सेवा बंद झाल्याने नुकत्याच सुरू झालेल्या शाळा आणि त्या शाळेत एसटीतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे. खासगी वाहतुकीला खतपाणी घालण्यासाठी पेण तालुक्यातील दादर, भाल, कणे या महत्वाच्या गावांतील फेऱ्या बंद ठेवण्याचा निर्णय एसटी मंडळाने घेतला असल्याचे प्रवाशांकडून आरोप होत आहेत.

ग्रामीण भागातील प्रवाशांचा विचार करून आम्ही जसे जमेल तसे विविध प्रकारचे मार्ग काढून एसटी बस सेवा सुरू केली होती. मात्र, माझ्या कामगारांना अशाप्रकारे त्रास देण्याचा काम होत असेल तर ते आम्ही कदापी सहन करणार नाही. ही एसटी बससेवा पुन्हा सुरू करायची असेल तर संबंधित गावातील सरपंच किंवा पोलीस पाटील यांनी तेथील ग्रामस्थांची जबाबदारी घ्यावी आणि असे आमच्याकडे लेखी पत्र द्यावे, त्या पत्रावर बसेस सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, रायगडच्या एसटी विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -MLC Election 2022 : मतफुटीच्या भीतीने सेना आमदारांचा हॉटेलमध्ये मुक्काम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.