रायगड - अलिबाग महावितरण विभागातर्फे महा कृषी ऊर्जा अभियान अंतर्गत कृषी ऊर्जा पर्व साजरे केले जात आहे. यानिमित्ताने अलिबाग शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी हिरवा झेंडा दाखविला. जीवाश्म इंधनाचा साठा दिवसागणिक कमी होत असून सौर ऊर्जा म्हणजेच हरित ऊर्जेचा वापर करणे नितांत गरजेचे आहे. सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांना शाश्वत वीज पुरवठा दिल्यास त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल व खऱ्या अर्थाने राष्ट्र सुजलाम - सुफलाम होईल. असे मत रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
अलिबाग महावितरण विभागातर्फे सायकल रॅलीचे आयोजन - अलिबाग महावितरण विभागातर्फे सायकल रॅलीचे आयोजन
जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरू झालेल्या रॅलीची खंडाळा गावात सांगता झाली. हया ठिकाणी काशिनाथ तुणतुणे, विकास पाटील, पांडुरंग पाटील, विष्णू म्हात्रे हया शेतकऱ्यांनी त्यांच्या कृषी पंपाच्या विज बिलाचा भरणा केला.