ETV Bharat / state

पीएमसी बँकेच्या खोपोली शाखेसमोर ग्राहकांची गर्दी, ग्राहकांमध्ये संतापाची लाट

पंजाब महाराष्ट्र कॉर्पोरेशन बँकेच्या वार्षिक अहवालात अडचण आल्याने रिझर्व्ह बँकेने ६ महिन्यांसाठी या बँकेवर निर्बंध आणले आहेत. रिझर्व्ह बँकेची नोटीस या बँकेच्या बाहेर लावलेली आहे. ६ महिन्यात फक्त १ हजार रुपयेच मिळणार असल्याने ठेवीदार व सर्वसामान्य ग्राहकांपुढे आर्थिक संकटाचा प्रश्न उभा राहिला आहे.

पीएमसी बँकेच्या खोपोली शाखेसमोर ग्राहकांची गर्दी
author img

By

Published : Sep 24, 2019, 3:44 PM IST

रायगड - पंजाब महाराष्ट्र कॉर्पोरेशन बँकेच्या वार्षिक अहवालात अडचण आल्याने रिझर्व्ह बँकेने ६ महिन्यांसाठी या बँकेवर निर्बंध आणले आहेत. रिझर्व्ह बँकेची नोटीस या बँकेच्या बाहेर लावलेली आहे. यात ६ महिन्यात फक्त १ हजार रुपयेच मिळणार असल्याने ठेवीदार व सर्व सामान्य ग्राहकांपुढे आर्थिक संकटाचा प्रश्न उभा राहिला आहे.

पीएमसी बँकेच्या खोपोली शाखेसमोर ग्राहकांची गर्दी

जिल्ह्यात खोपोली येथे पीएमसी बँकेची शाखा असून सकाळपासून बँकेच्या बाहेर ग्राहकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत होती. या शाखेत हजारो ग्राहकांनी ठेवी ठेवल्या आहेत. काही जणांनी आपल्या आयुष्यभराची कमाई बँकेत जमा केली आहे. फिक्स डिपॉझिट, सेविंग्ज खाते, रिकरिंग खाते अशी खाती ग्राहकांनी उघडली आहेत. ग्राहकांना सकाळपासूनच पीएमसी बँक बंद होणार असल्याचे फोन, मेसेज येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ग्राहकांनी बँकेत धाव घेतली.

हेही वाचा - रायगड : मांडवा ते गेट वे जलवाहतूक बोटसेवा सुरू

ग्राहकांनी एकच गर्दी बँकेत व बाहेर केलेली दिसत होती. बँकेतर्फे फक्त १ हजारच रुपये मिळणार असल्याने ग्राहकांनी बँकेपुढे रांगा लावलेल्या होत्या. तर, अनेकांसमोर आता आर्थिक संकट उभे राहिले असल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - रायगडात पुरातन मूर्तींची विक्री करणाऱ्या तिघांना अटक

Intro:पीएमसी बँकेच्या खोपोली शाखेसमोर ग्राहकांची गर्दी

ग्राहकांमध्ये संतापाची लाट

रायगड : पंजाब महाराष्ट्र कॉर्पोरेशन बँकेच्या वार्षिक ऑडिटमध्ये अडचण आल्याने रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले आहेत. जिल्ह्यात खोपोली येथे पीएमसी बँकेची शाखा असून सकाळपासून बँकेच्या बाहेर ग्राहकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत होती. रिझर्व्ह बँकेची नोटीस बँकेच्या बाहेर लावली असून सहा महिन्यात फक्त एक हजार रुपयेच मिळणार असल्याने ठेवीदार व सर्व सामान्य ग्राहकापुढे आर्थिक संकटाचा प्रश्न उभा राहिला आहे.Body:पीएमसी बँकेची खोपोलिमध्ये शाखा आहे. या शाखेत हजारो ग्राहकांनी ठेवी ठेवल्या आहेत. काही जणांनी आपल्या आयुष्यभराची कमाई बँकेत ठेवलेली आहे. फिक्स डिपॉझिट, सेविंग्ज खाते, रिकरिंग खाते अशी खाती ग्राहकांनी उघडली आहेत. पीएमसी बँक बंद होणार असल्याचे सकाळपासून ग्राहकांना फोन, मेसेज येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ग्राहकांनी बँकेत धाव घेतली.Conclusion:ग्राहकांनी एकच गर्दी बँकेत व बाहेर केलेली दिसत होती. बँकेतर्फे फक्त एक हजारच रुपये मिळणार असल्याने ग्राहकांनी रांगा लावलेल्या होत्या. तर अनेक ग्राहकासमोर आता आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.