ETV Bharat / state

'सिटीस्कॅन तपासणीमुळे वाचलेत अनेक कोरोनाबाधितांचे प्राण' - live marathi news

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयाला 2017 साली रिलायन्स कंपनीने सिटीस्कॅन मशीन भेट दिली आहे. त्यामुळे कोरोनाच्या या कठीण परिस्थितीत या सिटीस्कॅन मशीनचा मोठा फायदा रुग्णांच्या निदानासाठी होऊ लागला आहे. सिटीस्कॅन विभागाची जबाबदारी रेडिओ डायग्नोसिस डॉ. सुहास ढेकणे याच्या खांद्यावर आहे.

विशेष बातमी
विशेष बातमी
author img

By

Published : May 13, 2021, 8:54 PM IST

रायगड - कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचे सिटीस्कॅन करून त्याचे फुफुस किती निकामी झाले याची तपासणी केली जात आहे. सिटीस्कॅन केल्यानंतर आलेल्या स्कोअरनुसार रुग्णावर उपचार केले जातात. रायगड जिल्ह्यात 1 एप्रिलपासून आतापर्यंत साधारण दोन हजार रुग्णांची क्ष-किरण तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात रेडिओ डायग्नोसिस डॉ. सुहास ढेकणे यांनी केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या अनुषंगाने सिटीस्कॅन अहवालानुसार रुग्णावर त्वरित उपचार केल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले आहे. सिटीस्कॅन स्कोअर बाबत नागरिकांमध्ये कुतूहल वाढले असल्याने सिटीस्कॅन परिसरात रेडिएशन जास्त असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तपासणी करून घ्या, गरज नसल्यास तरुण आणि मध्यम नागरिकांनी सिटी स्कॅन करू नका, असे आवाहन डॉ. सुहास ढेकणे यांनी नागरिकांना केले आहे. सिटीस्कॅनबाबत डॉ. सुहास ढेकणे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेली प्रतिक्रिया.

सिटीस्कॅन तपासणीमुळे वाचलेत अनेक कोरोनाबाधितांचे प्राण

कोरोना विषाणू फुप्फुसवर करीत आहे आघात
कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूत बराच बदल झाला आहे. या लाटेत आढळणाऱ्या कोरोना रुग्णाच्या फुप्फुसावर विषाणू हा आघात करीत आहे. फुप्फुसाला सूज येऊन कोरोना आणि फुप्फुसाच्या घर्षणाने फुफुसावर आवरण तयार होते. जेणेकरून रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. त्यामुळे रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासू लागते. यासाठी सिटीस्कॅन करुन रुग्णावर स्कोअरनुसार त्वरित उपचार सुरू केले जातात.

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात केले जाते सिटीस्कॅन
अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयाला 2017 साली रिलायन्स कंपनीने सिटीस्कॅन मशीन भेट दिली आहे. त्यामुळे कोरोनाच्या या कठीण परिस्थितीत या सिटीस्कॅन मशीनचा मोठा फायदा रुग्णांच्या निदानासाठी होऊ लागला आहे. सिटीस्कॅन विभागाची जबाबदारी रेडिओ डायग्नोसिस डॉ. सुहास ढेकणे याच्या खांद्यावर आहे. आपल्या सहा टेक्निशियन्स आणि दोन शिपाई यांच्या सोबतीने एप्रिल महिन्यांपासून डॉ. ढेकणे अहोरात्र सेवा बजावत आहे. कोरोनाच्या या काळात आठवड्याचे चोवीस तास सेवा सिटीस्कॅन विभागातर्फे दिली जात आहे. 1 एप्रिल 2021 पासून आतापर्यत दोन शिफ्टमध्ये काम करून दोन हजारांहून अधिक रुग्णांचे सिटीस्कॅन करून योग्य निदान केले आहे. रोज 40 ते 50 जणांचे सिटीस्कॅन केले जात आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविणे शक्य झाले आहे.

सिटीस्कॅनचा स्कोअर कसा मोजला जातो?
कोरोना विषाणू हा फुप्फुसाला निकामी करीत आहे. फुफुस किती निकामी केले आहे हे पाहण्यासाठी रुग्णाचे सिटीस्कॅन करणे गरजेचे आहे. सिटीस्कॅन केल्यानंतर आलेल्या स्कोअरनुसार रुग्णावर उपचार सुरू केले जातात. सिटीस्कॅन स्कोअरबाबत सध्या नागरिकांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे. नक्की हा स्कोअर मोजला कसा जातो. याबाबत डॉ. सुहास ढेकणे यांनी माहिती दिली आहे. शरीरातील फुप्फुसाचे पाच कप्पे केले असून प्रत्येक कप्प्याला पाच मार्क दिले आहेत. सिटीस्कॅन केल्यानंतर कोरोना विषाणूने फुप्फुसाचे किती कप्पे निकामी केले आहेत. त्यानुसार स्कोअर ठरवला जातो. 25 हा स्कोअर फुप्फुसाच्या पाच कप्प्याचा असतो. टक्केवारी नुसार हा स्कोअर रिपोर्ट तयार केला जातो. 25 पैकी 12 स्कोअर आला तर पन्नास टक्के फुफुस निकामी झाले असले तरी योग्य उपचार घेऊन रुग्ण बरा होतो. त्यामुळे स्कोअर बाबत असलेला गैरसमज हा नागरिकांनी डोक्यातून काढून टाकून योग्य उपचार घेतल्यास रुग्ण बरा होतो अशी प्रतिक्रिया क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. सुहास ढेकणे यांनी दिली आहे.

'एक-दोन वेळाच सिटीस्कॅन करा, आग्रह धरू नका'
कोरोना झालेला रुग्ण हा सिटीस्कॅन करण्याचा पहिला आग्रह धरत असतो. मात्र लागण झाल्या झाल्या सिटीस्कॅन केल्यास स्कोअर हा शून्य येतो. चार-पाच दिवसांनी केल्यानंतर स्कोअर वाढलेला असतो. सिटीस्कॅनमधून रेडिएशन निघत असल्याने कॅन्सरसारखा आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांना सौम्य कोरोना लक्षणे आहेत, तरुण किंवा मध्यमवर्गीय नागरिकांनी सिटीस्कॅनचा आग्रह धरू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सिटीस्कॅन करावे. एक ते दोन वेळा सिटीस्कॅन करणे फायदेशीर आहे. जास्तवेळ सिटीस्कॅन केल्यास कॅन्सर सारखा आजार जडण्याची शक्यता आहे. अशी प्रतिक्रिया डॉ. सुहास ढेकणे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळला बसणार चक्रीवादळाचा तडाखा

हेही वाचा - 'ब्रेक दि चेन' अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.