ETV Bharat / state

प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या अलिबागमधील विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Alibaug

आज आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र विठूनामाचा, ज्ञानोबा-तुकोबांचा गरज होत आहे. विठ्ठलभक्तांसाठी आजचा दिवस म्हणजे एक पर्वणीच असते. आषाढी एकादशीनिमित्त अलिबागमधील वरसोली येथील प्रति पंढरपूर असलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी रांग लागली होती.

विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
author img

By

Published : Jul 12, 2019, 8:51 AM IST

रायगड - आज आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र विठूनामाचा, ज्ञानोबा-तुकोबांचा गरज होत आहे. विठ्ठलभक्तांसाठी आजचा दिवस म्हणजे एक पर्वणीच असते. आषाढी एकादशीनिमित्त अलिबागमधील वरसोली येथील प्रति पंढरपूर असलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी रांग लागली होती. मंदिर परिसर हा भक्तिमय वातावरणाने फुलून गेला आहे.

विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अलिबाग शहराला लागून असलेल्या वरसोलीमधील प्रति पंढरपूर असललेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटे अडीच वाजता काकड आरती झाली. मंदिराचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी सपत्नीक विठ्ठल रखुमाईची महापूजा केली. त्यानंतर भाविकांसाठी दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.

काकड आरती व विठ्ठल रखुमाई यांची पूजा झाल्यानंतर भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. विठ्ठल रखुमाई मंदिरातील गाभारा हा फुलांनी सजवला असून, विठुराया व रखुमाई यांच्या मूर्तीलाही साज श्रुंगारांनी सजवले होते. विठूराय व रखुमाई यांच्या दर्शनामध्ये भक्तगण तल्लीन झाले होते.

मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विश्वस्त मंडळाकडून योग्य नियोजन केले आहे. पावसाळा असल्याने मंदिराच्या पटांगणात मंडप टाकण्यात आला आहे. तर भाविकांना प्रसादासाठी पटांगणात मिठाई व खेळण्याची दुकाने थाटण्यात आली आहेत.

सकाळी साडेनऊ वाजल्यापासून मंदिरात कीर्तन, भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अलिबाग तालुक्यातून रेवस, बोडणी, नवगाव, वरसोली येथून कोळी बांधवांच्या दिंड्या विठ्ठल मंदिरात येत असतात. तर शाळेतील विद्यार्थ्यांच्या दिंड्याही येत असतात. येणाऱ्या भक्तांना व्यवस्थित दर्शन मिळावे यासाठी विश्वस्त मंडळाकडून सुविधा केली असून, पोलिसांचाही बंदोबस्त मंदिरात ठेवण्यात आला आहे.

Intro:

अलिबाग वरसोली येथील प्रति पंढरपूर श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई मंदिरात भक्ताची मांदियाळी

पहाटेपासून विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

रायगड : युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा अशा या विठू माऊलीचा आषाढी एकादशीचा आजचा दिवस म्हणजे विठ्ठल भक्तासाठी म्हणजे एक पर्वणीच. विठ्ठल रसात रमलेले भाविक भक्तगण आज विठूरायांच्या दर्शनाच्या दर्शनाला आतुर झाले आहेत. अलिबागमधील वरसोली येथील प्रति पंढरपूर असलेले श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटे पासून भक्तांची दर्शनासाठी रांग लागली होती. श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई मंदिर परिसर हा भक्तिमय वातावरणाने फुलून गेला आहे.

Body:अलिबाग शहराला लागून असलेल्या वरसोलीमधील प्रति पंढरपूर श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटे अडीच वाजता काकड आरती झाली. मंदिराचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी सपत्नीक विठ्ठल रखुमाईची यथासांग पूजा केली. त्यानंतर भाविकांसाठी दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.

काकड आरती व विठ्ठल रखुमाई यांची पूजा झाल्यानंतर भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. विठ्ठल रखुमाई मंदिरातील गाभारा हा फुलांनी सजविला असून विठुराया व रखुमाई यांच्या मूर्तीलाही साज श्रुंगारांनी सजविले होते. विठूराय व रखुमाई यांच्या दर्शनामध्ये भक्तगण तल्लीन झाले होते.

Conclusion:श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये व दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी योग्य नियोजन विश्वस्त मंडळाकडून केले आहे. पावसाळा असल्याने मंदिराच्या पटांगणात मंडप टाकण्यात आला आहे. तर भाविकांना प्रसादासाठी पटांगणात मिठाई व खेळण्याची दुकाने थाटण्यात आली आहेत.

सकाळी साडेनऊ वाजल्यापासून मंदिरात कीर्तन, भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अलिबाग तालुक्यातून रेवस, बोडणी, नवगाव, वरसोली येथून कोळी बांधवांच्या दिंड्या विठ्ठल मंदिरात येत असतात. तर शाळेतील विद्यार्थ्यांच्या दिंड्याही येत असतात. येणाऱ्या भक्तांना व्यवस्थित दर्शन मिळावे यासाठी विश्वस्त मंडळाकडून सुविधा केली असून पोलिसांचाही बंदोबस्त मंदीरात ठेवण्यात आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.