रायगड - संकष्टी चतुर्थी आणि रविवार सोबत आल्याने खालापुर तालुक्यातील महड अष्टविनायकला भाविकांनी गर्दी केली होती. येथे श्री वरद विनायकाच्या दर्शनासाठी लांबून-लांबून भाविक दर्शनासाठी येत असतात. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने, येथे सकाळपासूनच भाविकांच्या लांबच्या-लांब रांगा लागल्या होत्या. या रांगा संध्याकाळी उशीरापर्यंत दिसत होत्या. मात्र, कोरोनामुळे मंदीर बंद आहेत. त्यामुळे सर्व भक्तांना प्रवेशद्वारावरूनच अष्टविनायकाचे दर्शन घ्यावे लागत होते.
कोरोनाचे संकट असतानाही महड येथे भक्तांची दर्शनासाठी गर्दी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच ठिकाणी मंदीरे बंत आहेत. अनेक शहरांत लॉगडाउनची परिस्थिती आहे. तसेच, अनेक प्रार्थनास्थळेही बंद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे सर्वच भक्तांना आपल्या आराध्यदैवताचे दर्शन लांबूनच घ्यावे लागत आहे. मात्र, काही ठिकाणी कोरोनाबाबतचे नियम हटवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी शासकीय नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक भाविक दर्शनासाठी घराबाहेर पडत आहेत. सर्वांना कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक भाविक अष्टविनायकाला प्रार्थना करत आहेत. दरम्यान, संकष्ट चतुर्थी आणि रविवार असल्याने येथील महड अष्टविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.