ETV Bharat / state

पनवेलमध्ये तरुणावर हल्ला करणाऱ्या नगरसेवकाची मुलं अजूनही फरार, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

author img

By

Published : Aug 9, 2019, 11:11 AM IST

Updated : Aug 10, 2019, 3:48 PM IST

आरोपी हे नगरसेवक गायकवाड यांची मुले असल्याने पोलिसांचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास उशीर होतोय का? अशी चर्चा सध्या पनवेलमध्ये सुरू आहे.

नगरसेवकाची हल्लेखोर मुले

पनवेल - नगरसेवक जगदीश गायकवाड यांची तीन मुले आणि भाच्याने एका तरुणाच्या डोक्यात चक्क ८ बिअरच्या बाटल्या फोडून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. विश्वनाथ गायकवाड असे या तरुणाचे नाव असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. पनवेल येथील रोडपालीजवळच्या गिरीराज रेस्टॉरंट अँड बारसमोर शनिवारी (३ ऑगस्ट) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पनवेलमध्ये तरुणावर हल्ला करणाऱ्या नगरसेवकाची मुलं अजूनही फरार

आम्ही नगरसेवकाची मुले आहोत, त्यामुळे आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करायची हिंमत कशी होते, असे म्हणत पनवेलचे गोल्डमॅन नगरसेवक गायकवाड यांच्या सिध्दांत, संदेश आणि स्वप्निल या मुलांनी तरुणाला मारहाण केली. या घटनेमुळे कळंबोलीतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्तेत असलेल्या नगरसेवकाची मुले असून सुद्धा पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची हिंमत या तरुणाने केली. हे नगरसेवक पुत्रांना जिव्हारी लागल्यामुळे त्यांनी तक्रारदार तरुणाच्या भावाला एकट्यात गाठले आणि ५ गुंडांच्या मदतीने त्याच्या डोक्यावर आणि पाठीवर ८ बियरच्या बाटल्या फोडल्या. विश्वनाथ सध्या आयसीयुमध्ये आहे. आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून हादरलेले विश्वनाथचे कुटुंबीय आजही नगरसेवक गायकवाड यांच्या दहशतीखाली राहत आहेत. मात्र, तरीही कळंबोलीचे पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप पीडिताच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेला ५ दिवस उलटले तरी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. त्यामुळे नगरसेवकच्या राजकीय वरदहस्तामुळे पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

पीडित तरुणाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली असती तर आज आमच्या मुलावर हल्ला करण्याची हिंमत झाली नसती, असे म्हणत पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे जर यावेळी आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही तर आम्ही उपोषणाला बसू, असा इशारा पीडित कुटुंबियांनी दिला आहे.

पीडित तरुण सध्या आयसीयुमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. तरीही पोलिसांनी आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलेला नाही. नवी मुंबई पोलीस दलातील 'सिंघम' अशी ओळख असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये पदभार स्वीकारल्यानंतर कळंबोलीतील अनेक गुन्हेगारांचे धाबे दणाणून सोडले आहे. गुन्हेगारीचा बिमोड, पोलीस आणि जनतेतील सुसंवाद वाढवण्याबरोबरच कळंबोली पोलीस ठाण्याची प्रतिमा त्यांनी उंचावली आहे. तरीही या प्रकरणात मात्र, कळंबोली पोलीस आरोपींना शोधण्यात विलंब का करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातील आरोपी हे नगरसेवक गायकवाड यांची मुले असल्याने पोलिसांचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास उशीर होतोय का? अशी चर्चा सध्या पनवेलमध्ये सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

या नगरसेवक पुत्र आणि भाच्याने ५ दिवसांपूर्वी विश्वनाथ गायकवाडचा भाऊ सिद्धार्थला मारहाण केली. त्याने याविरोधात तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात ठेवून विश्वनाथवर जीवघेणा केला. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही कारणावरुन नगरसेवक गायकवाड यांच्या मुलांनी सिद्धार्थला मारहाण केली होती. याबाबत त्याने कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. मात्र, आम्ही नगरसेवकाची मुले असल्यानं आमच्या विरोधात कोण तक्रार दाखल करू शकतो? असे म्हणत नगरसेवकाची मुले सिद्धार्थचा शोधत घेत होती. मात्र, सापडत नसल्यामुळे त्यांनी त्याचा राग विश्वनाथवर काढला.

Intro:टीप:-
सोबत विओ जोडला आहे. त्यात कुठे कोणती बाईट लावायची आहे ते व्हिडीओ मधील वेळेनुसार नमूद केले आहे. सोबतीच्या चार वाक्याचे ग्राफिक्सवर विओ लावता आले तर उत्तम होईल. सर्व बाईट्स एकाच व्हिडीओ मध्ये आहेत. स्क्रीप्ट मध्ये लिहीलेल्या वेळेनुसार पाहून त्यात बाईट लावणं सोपं जाईल. शेवटी P2C लावून पॅकेजचा साइन आउट करावा, ही विनंती. पॅकेज साठी फुटेज याच slug ने फोटो आणि व्हिडीओ सोबत जोडले आहेत.

Location- पनवेल

Gfx+VO

1) सत्तेचा माज पनवेलच्या नगरसेवकाला पडला महागात

2) तरुणाच्या डोक्यात चक्क आठ बिअरच्या बाटल्या फोडल्या

3) पीडित तरुणाची मृत्यूशी झुंज

4) तीन दिवसानंतर ही गुंड नगरसेवक पुत्र मोकाटंच

Vo1

पनवेलमध्ये सत्तेचा माज चढलेल्या नगरसेवकाच्या मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात चक्क आठ बिअरच्या बाटल्या फोडून जीवघेणा हल्ला केला. हा तरुण पहा...पापणीचा भाग फाटलेेला, चेहरा सुजलेल्या अवस्थेत, आणि डोक्यावर, पाठीवर बिअरच्या बाटल्या फोडून जीवघेणा हल्ला झाल्यानं अंगावर जखमा सहन करत विव्हळत असलेला हा तरुण....विश्वनाथ गायकवाड असं या तरुणाचं नाव आहे...तुमच्या आमच्या सर्वसामान्यांसारखाच हा विश्वनाथ गायकवाड.... पण आता तो सध्या मृत्यूच्या दारात येऊन उभा राहीलाय...याची ही अवस्था करणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर लोकांच्या सेवासाठी असा टॅग लावून फिरणाऱ्या नगरसेवक जगदीश गायकवाड यांची तीन मुले आणि एक भाचा अशा चौघांनी मिळून या तरुणाच्या डोक्यावर, पोटावर चक्क आठ बिअरच्या बाटल्या फोडल्या...शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास पनवेलच्या रोडपाली इथल्या गिरीराज बार अँड रेस्टॉरंटसमोर नगरसेवक जगदीश गायकवाड यांची तीन मुलं आणि एक भाचा यांनी चार ते पाच गुंडांना आणून एकट्या विश्वनाथवर हा जीवघेणा हल्ला केला....सत्तेच्या खुर्चीत बसलेल्या नगरसेवक जगदिश गायकवाड यांच्या या मुलांना नक्की कसला माज चढला ते ऐका....

Byte- पीडित विश्वनाथ गायकवाड यांचा भाऊ
(0.00sec -1.17 sec ) Body:Vo2
पनवेलचे गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांची तीन मुलं सिध्दांत, संदेश आणि स्वप्निल....
आम्ही नगरसेवकाची मुलं आहोत, त्यामुळे आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करायची हिम्मतच कशी होते अशी वल्गना करून एका सामान्य तरुणाला मृत्यूच्या दारात पोहोचवणारे हे नगरसेवक पुत्र पहा.. हातात चक्क बंदूक घेऊन वावरणारे या नगरसेवक पुत्रांनी कळंबोलीतल्या नागरिकांमध्ये दहशत पसरवलीये... सत्तेत असलेल्या नगरसेवकाची मुलं असून सुद्धा पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची हिम्मत या तरुणाने केली, हे नगरसेवक पुत्रांना इतकं जिव्हारी लागलं की त्यांनी तक्रारदार तरुणाच्या भावाला एकट्यात गाठलं आणि आणखी पाच गुंडांच्या सोबतिने आठ बियरच्या बाटल्या त्याच्या डोक्यावर, पाठीवर सपासप फोडल्या...विश्वनाथ सध्या आयसीयु मध्ये आहे...आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून हादरलेले विश्वनाथचे कुटुंबिय आजही गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या दहशतीखाली राहतायेत...परंतु कळंबोली पोलीस प्रशासन मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कुुुटुंबियांनी केेलाय....या घटनेला चार दिवस उलटले तरी अद्याप आरोपीना अद्याप अटक केलेली नाही...गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या राजकीय वरदहस्तामुळे पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

बाईट- पीडित तरुणाचा भाऊ, ( दहशत)
(2.04 sec - 3.20 sec)

Vo3

जेव्हा सुरवातीला पीडित तरुणाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली असती तर आज आमच्या मुलावर हल्ला करण्याची हिंमत झाली नसती हे सांगताना पीडित तरुणाच्या कुटुंबियांच्या डोळ्यात असलेली दहशत स्पष्टपणे दिसून येत होती...त्यामुळे जर यावेळी तरी आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही तर आम्ही उपोषणाला बसू असा इशारा पीडित कुटुंबियांनी दिला आहे.

बाईट- पीडित तरुणाचं भाऊ
(6.17 sec ते 6.37 sec) (10.27 sec- 11.14 sec)Conclusion:Vo4
धक्कादायक म्हणजे या घटनेत पीडित तरुण इतका जखमी झालाय की तो सध्या आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देतोय, तरीही पोलिसांनी आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलेला नाही. नवी मुंबई पोलीस दलातील सिंघम अशी ओळख असलेल्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर कळंबोलीतील अनेक गुन्हेगारांचे धाबे दणाणून सोडले आहे. गुन्हेगारीचा बीमोड, पोलीस आणि जनतेतील सुसंवाद वाढवण्याबरोबरच कळंबोली पोलीस स्टेशनची प्रतिमा त्यांनी उंचावली आहे. तरीही या प्रकरणात मात्र कळंबोली पोलीस आरोपींना शोधण्यात विलंब का करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित होतोय. यातील आरोपी हे गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांचे मुलं असल्याने पोलिसांचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास उशीर होतोय का अशी चर्चा सध्या पनवेलमध्ये होतेय.

P2C- प्रमिला पवार, प्रतिनिधी

---------
Last Updated : Aug 10, 2019, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.