ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यात चार ठिकाणी कोरोना लसीकरणाचा ड्राय रन सुरू - रायगड कोरोना लसीकरण न्यूज

संपूर्ण राज्यात फ्रन्टलाइन वर्करसाठी पहिल्या टप्प्यात कोविड-19 लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्यक्ष लसीकरणापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात आज लसीकरणाचा ड्राय रन घेतला जात आहे. रायगडमध्ये आज चार ठिकाणी ड्राय रन सुरू आहे.

Corona Vaccination
कोरोना लसीकरण
author img

By

Published : Jan 8, 2021, 12:42 PM IST

रायगड - कोविड 19 लसीकरण मोहीमेला लवकरच सुरुवात होणार आहे. त्याअगोदर लसीकरणाची रंगीत तालीम म्हणून ड्राय रन घेतले जात आहेत. आज राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ड्राय रन सुरू आहे. रायगड जिल्ह्यातही अलिबाग जिल्हा रुग्णालय, पेण उपजिल्हा रुग्णालय, श्रीवर्धन प्राथमिक आरोग्य केंद्र, पोयनाड आरोग्य केंद्र या चार ठिकाणी ड्राय रन सुरू आहे.जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन या ड्राय रनची पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

रायगडमध्ये चार ठिकाणी कोरोना लसीकरणाचा ड्राय रन सुरू झाला

जिल्हा सामान्य रुग्णालयासह तीन ठिकाणी कक्ष स्थापन -

कोविड-19 लसीकरण मोहीमेच्या रंगीत तालमीला सुरुवात झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड-19 लसीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लसीकरण मोहिमेत आरोग्य यंत्रणेला कशा पद्धतीने लस द्यायची आहे, याची माहिती व्हावी यासाठी ही रंगीत तालीम आहे. जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन, पेण याठिकाणी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यात साडे आठ हजार लाभार्थ्यांची यादी तयार -

जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील साडे आठ हजार लाभार्थ्यांची यादी आरोग्य यंत्रणेने तयार केली आहे. दररोज 100 लाभार्थ्यांना कोविडची लस दिली जाईल. यासाठी आज ड्राय रन होत आहे. आज प्रत्येक केंद्रावर 25 लाभार्थी लस घेणार आहेत. जिल्ह्यात भविष्यात 52 ठिकाणी केंद्र उभारून लसीकरण केले जाणार आहे.

अशी दिली जाणार लस -

जिल्ह्यातील लाभार्थ्यांची याची कोव-इन या अ‌ॅपवर नोंदणी केली आहे. लसीकरण केंद्रात आल्यानंतर प्रथम लाभार्थ्यांची तापमान तपासणी, ऑक्सिजन तपासणी होईल. त्यानंतर त्यांना सॅनिटायझर देऊन व आयडी तपासून आत सोडले जाणार आहे. त्यानंतर कोव-इन या अ‌ॅपवर लाभार्थ्याची माहिती तपासून पुन्हा नोंदणी केली जाणार. लाभार्थ्याला अभ्यागत कक्षात बसवून नंबर आल्यानंतर त्यांना लसीकरण कक्षात सोडले जाणार आहे. लसीकरण कक्षात गेल्यानंतर त्याची माहिती घेऊन त्यांना लस टोचली जाणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांना त्रास होत असेल तर विश्राम कक्षात 30 मिनिटे बसवले जाणार आहे.

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ड्राय रनची पाहणी केली

प्रशासनाची तयारी पूर्ण -

शासनाच्या आदेशाने कोविड-19 लसीकरण मोहिमेची रंगीत आजपासून सुरू झाली आहे. यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी झाली असून आरोग्य यंत्रणाही तयारीत आहे. जिल्ह्यात लाख 5 लस दाखल झाल्यानंतर त्वरित लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.