रायगड - देशात कोरोनाची पहिली लाट आली तेव्हाच ही लाट थोपविण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी व काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी काही सूचना केल्या होत्या. त्याची भाजपच्या नेत्यांनी थट्टा केली. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट येईल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने ऑक्टोबर महिन्यातच दिला होता. पण, पंततप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणाचेच ऐकले नाही. ते बहिणजी-बहिणजी करत निवडणूक प्रचार करत राहीले. मोदींच्या या अहंकारामुळेच देश सध्या स्मशान बनला आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
अलिबाग यथे बॅ.ए.आर.अंतुले भुवन येथे शनिवारी (दि. 22 मे) आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते. कोरोना भारतात वाढण्यास पंतप्रधानांचा अहंकारी पणा कारणीभूत आहे. विरोधकांच्या सूचनांकडे दर्लक्ष करणे, विरोधकांनी केलेल्या सुचनांची थट्टा करणे केंद्र सरकारने थांबवले पाहिजे. विरोधकांना सोबत घेऊन देश वाचविण्याचे काम केले पाहिजे. कोरोनाच्या माहामारीतून देशाला बाहेर काढण्यासाठी विरोधक व तज्ज्ञांना सोबत घेऊन एक मोहीम आखायाला हवी, असे नाना पटोले म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापनचा अभ्यास करावा
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा पूर्ण अभ्यास करावा त्यानंतरच त्यावर व्यक्तव्य करावे, असे नाना पटोले म्हणाले. देशाच्या एकूण महसूलातील 40 टक्के महसूल महाराष्ट्रातून जातो. त्यामुळे महाराष्ट्राला सर्वाधिक मदत मिळालीच पाहिजे. पंतप्रधान निधीसाठी सर्व राज्यातून निधी जातो. त्यामुळे राज्यांना मदत करणे ही केंद्रची घटनात्मक जबाबदारी आहे, असे पटोले म्हणाले.
नवगव, वरसोली, उसर येथे केली नुकसान भागाची पाहणी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज (दि. 22 मे) तौक्ती चक्रीवादळ नुकसान भागाची पाहणी करण्यासाठी रायगड दौऱ्यावर आले आहेत. रायगड जिल्ह्यात अलिबाग नवगव समुद्रकिनारा, वरसोली, उसर या ठिकाणी नुकसान भागाची पाहणी केली. खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अॅड. श्रद्धा ठाकूर, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अॅड. प्रथमेश पाटील यांसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - बंगाल आणि जगाने विदूषक कोण हे दाखविले आहे.. शेलारांच्या टीकेला पटोलेंचे प्रत्युत्तर