ETV Bharat / state

रायगड : एकेकाळी वर्चस्व असलेले काँग्रेस, शेकाप आज दुसऱ्याला देत आहेत टेकू

एकेकाळी काँग्रेस व शेकापचा बालेकिल्ला असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघात शेकाप व काँग्रेस पक्षाची वाताहत होताना दिसत आहे.  हे पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहेत.

author img

By

Published : Apr 2, 2019, 4:07 PM IST

एकेकाळी वर्चस्व असलेले काँग्रेस, शेकाप आज दुसऱ्याला देत आहेत टेकू

रायगड - रायगड म्हणजे पूर्वीचा कुलाबा जिल्हा. या मतरदारसंघात १९९५२ ते २००४ पर्यंत काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाचे आलटून पालटून प्राबल्य राहिले होते. २००९ नंतर आजपर्यंत हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिलेला आहे. मात्र, एकेकाळी काँग्रेस व शेकापचा बालेकिल्ला असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघात शेकाप व काँग्रेस पक्षाची वाताहत होताना दिसत आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांना पाठिंबा देण्याची नामुष्की या दोन पक्षावर आलेली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस व शेकाप हे लोकसभा निवडणुकिवर पाणी सोडणार अशी वेळ दोन्ही पक्षावर आलेली आहे.

चिंतामण देशमुख कुलाब्याचे पहिले खासदार

१९५२ कुलाबा लोकसभा मतदार संघात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे चिंतामण देशमुख विजयी झाले होते. त्यांनी शेकापचे उमेदवार राजाराम राऊत यांचा पराभव केला होता. कुलाबा जिल्ह्याचे पहिले खासदार म्हणून चिंतामण देशमुख यांना मान मिळाला आहे. त्यानंतर १९५७ ला शेकापचे राजाराम राऊत, १९६२ भास्कर दिघे (काँग्रेस),१९६७ दत्तात्रेय कुंटे (शेकाप), १९९७१ शंकर सावंत (काँग्रेस), १९७७ दिनकर पाटील (शेकाप), १९८० अंबाजी पाटील (काँग्रेस आय), १९८४ दिनकर पाटील (शेकाप), १९८९, १९९१, १९९६ बॅ. ए. आर. अंतुले (काँग्रेस आय), १९९८, १९९९ रामशेठ ठाकूर (शेकाप) हे काँग्रेस, शेकापचे ३ उमेदवार कुलाबा लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते.

२००४ ला कुलाबाचे नाव बदलून जिल्ह्याला रायगड नाव देण्यात आले. रायगड लोकसभेतून २००४ ला पुन्हा काँग्रेसचे बॅ. एआर अंतुले निवडून आले. २००९ व २०१४ च्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने खेचून आणला. तर २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला आला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी पराभव केला होता.

शेकापने ६ तर काँग्रेसने ८ वेळा जिंकली लोकसभा

कुलाबा जिल्ह्याच्या निर्मितीपासून या लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस व शेकाप यांचेच वर्चस्व आलटून पालटून राहिले होते. शेकापने ६ तर काँग्रेसने ८ वेळा या मतदारसंघात लोकसभा जिंकली होती. तर शिवसेनेने १९९१ पासून आपले उमेदवार या मतदारसंघात उभे केले होते. शिवसेनेने १९९१ मध्ये सतीश प्रधान, १९९६, १९९८ अनंत तरे, १९९९ दी. बा. पाटील, २००४ शाम सावंत हे उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे केले होते. मात्र, त्यांना यश प्राप्त झाले नाही. तर भाजपनेही एकदा १९८९ मध्ये नरेंद्र जाधव यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनाही यश मिळाले नव्हते.

अनंत गीते यांनी रायगडावर फडकवला भगवा

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बॅ. एआर अंतुले यांच्यासमोर शिवसेनेचे रायगडाला नवखे असलेले अनंत गीते यांना उभे करण्यात आले. गीते यांनी अंतुले यांचा यावेळी मोठ्या मताधिक्याने पराभव केला. शिवसेनेला हे यश मिळविण्यासाठी १८ वर्ष वाट पहावी लागली. त्यानंतर २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा पराभव करून पुन्हा शिवसेनेच्या अनंत गीते यांनी रायगडावर भगवा फडकवला.

काँग्रेस, शेकापला चिंतनाची गरज

काँग्रेस, शेकाप या बलाढ्य पक्षाचे एकेकाळी कुलाबा व नंतरच्या रायगड लोकसभा मतदार संघात वर्चस्व असताना शिवसेना पक्षाने २००९ नंतर आपले वर्चस्व या मतदार संघावर कायम ठेवले आहे. तर काँग्रेस व शेकाप यांचे जिल्ह्यात कमी झालेले वर्चस्व हा आगामी काळात दोन्ही पक्षांना चिंतन करणारा विषय ठरणार आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक ही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात होत आहे. तर एकेकाळी स्वतःचा प्रतिस्पर्धी उमेदवार देणारे काँग्रेस, शेकाप हे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहेत. ही खरी शेकाप व काँग्रेस पक्षासाठी चिंतेची बाब आहे.

Intro:रायगड लोकसभा मतदारसंघात एकेकाळी वर्चस्व असलेले काँग्रेस, शेकाप आज दुसऱ्याला देत आहेत टेकू

रायगड : रायगड म्हणजे पूर्वीचा कुलाबा जिल्हा. 1952 पासून ते 2004 पर्यत या जिल्ह्यात काँग्रेस व शेकाप या दोन पक्षाचे आलटून पालटून लोकसभा मतदार संघात प्राबल्य राहिले होते. 2009 नंतर आजतायगत हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिलेला आहे. मात्र एकेकाळी काँग्रेस व शेकापचा बालेकिल्ला असलेल्या या रायगड लोकसभा मतदार संघात शेकाप व काँग्रेस पक्षाची वाताहत होताना दिसत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांना पाठिंबा देण्याची नामुष्की या दोन पक्षावर आलेली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस व शेकाप हे लोकसभा निवडणुकिवर पाणी सोडणार अशी वेळ दोन्ही पक्षावर आलेली आहे.

1952 मध्ये पहिल्या 3 कुलाबा लोकसभा मतदार संघात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे चिंतामण देशमुख विजयी झाले होते. त्यांनी शेकापचे उमेदवार राजाराम राऊत यांचा पराभव केला होता. कुलाबा जिल्ह्याचे पहिले खासदार म्हणून चिंतामण देशमुख यांना मान मिळाला आहे. त्यानंतर 1957 ला शेकापचे राजाराम राऊत, 1962 भास्कर दिघे (काँग्रेस), 1967 दत्तात्रेय कुंटे (शेकाप), 1971 शंकर सावंत (काँग्रेस), 1977 दिनकर पाटील (शेकाप), 1980 अंबाजी पाटील (काँग्रेस आय), 1984 दिनकर पाटील (शेकाप), 1989, 1991, 1996 बॅ. ए. आर. अंतुले (काँग्रेस आय), 1998, 1999 रामशेठ ठाकूर (शेकाप) हे 3 कुलाबा लोकसभा मतदार संघातून काँग्रेस, शेकापचे उमेदवार निवडून आले होते. Body:2004 ला कुलाबाचे नाव बदलून रायगड नाव जिल्ह्याला देण्यात आले. 32 रायगड लोकसभा 2004 ला पुन्हा काँग्रेसचे बॅ. ए आर अंतुले निवडून आले. 2009 व 2014 च्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघ शिवसेनेने खेचून आणला. तर 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला आला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी पराभव केला होता.

कुलाबा जिल्हा असल्यापासून या लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस व शेकाप यांचेच वर्चस्व आलटून पालटून राहिले होते. शेकापने 6, तर काँग्रेसने 8 वेळा या मतदार संघात लोकसभा जिकली होती. तर शिवसेनेने 1991 पासून आपले उमेदवार या मतदार संघात निवडणूक लढविण्यास उभे केले होते. शिवसेनेने 1991 मध्ये सतीश प्रधान, 1996, 1998 अनंत तरे, 1999 दी. बा. पाटील, 2004 शाम सावंत हे उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे केले होते. मात्र त्यांना यश प्राप्त झाले नाही. तर भाजपनेही एकदा 1989 मध्ये नरेंद्र जाधव यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनाही यश मिळाले नव्हते. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बॅ. ए आर अंतुले यांच्यासमोर शिवसेनेचे रायगडाला नवखे असलेले अनंत गीते याना उभे करण्यात आले. गीते यांनी अंतुले यांचा यावेळी मोठ्या मताधिक्याने पराभव केला. शिवसेनेला हे यश मिळविण्यासाठी 18 वर्ष वाट पहावी लागली. त्यानंतर 2014 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा पराभव करून पुन्हा शिवसेनेच्या अनंत गीते यांनी रायगडावर भगवा फडकवला.

काँग्रेस, शेकाप या बलाढ्य पक्षाचे एकेकाळी कुलाबा व नंतरच्या रायगड लोकसभा मतदार संघात वर्चस्व असताना शिवसेना पक्षाने 2009 नंतर आपले वर्चस्व या मतदार संघावर कायम ठेवले आहे. तर काँग्रेस व शेकाप याचे जिल्ह्यात कमी झालेले वर्चस्व हा आगामी काळात दोन्ही पक्षांना चिंतन करणारा विषय ठरणार आहे. 2019 ची लोकसभा निवडणूक ही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात होत आहे. तर एकेकाळी स्वतःचा प्रतिस्पर्धी उमेदवार देणारे काँग्रेस, शेकाप हे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहेत. ही खरी शेकाप व काँग्रेस पक्षासाठी चिंतेची बाब आहे.Conclusion:3 कुलाबा लोकसभा निवडणूक निकाल

वर्ष उमेदवार (पक्ष) मिळालेले मते

1952 चिंतामण देशमुख (काँग्रेस) 1,12,873
राजाराम राऊत (शेकाप) 70,785

( काँग्रेस विजयी)
--------------------------------------------------------------
1957 राजाराम राऊत (शेकाप) 1,21,033
दत्तात्रेय कुंटे (काँग्रेस) 57,558

(शेकाप विजयी)

--------------------------------------------------------------
1962 भास्कर दिघे (काँग्रेस) 98,680
राजाराम राऊत (शेकाप) 69,638
लीलाधर केणी (प्र.स.प.) 21,331
प्रभाकर पटवर्धन (जनसंघ) 13, 615

(काँग्रेस विजयी)

--------------------------------------------------------------
1967 दत्तात्रेय कुंटे (शेकाप) 1,64, 464
वसंत रणदिवे (काँग्रेस) 1,29,656
मनोहर ओक (जनसंघ) 18,236

(शेकाप विजयी)
--------------------------------------------------------------

1971 शंकर सावंत (काँग्रेस) 1,28,082
दत्तात्रेय पाटील (शेकाप) 81,883
अंबाजी पाटील (अपक्ष) 72,942
दत्तात्रेय कुंटे (भा.क्रा.द) 7893

( काँग्रेस विजयी)
--------------------------------------------------------------
1977 दिनकर पाटील (शेकाप) 1,99,462
शंकर सावंत (काँग्रेस) 1,42,142

(शेकाप विजयी)
--------------------------------------------------------------
1980 अंबाजी पाटील (इं, काँग्रेस) 1,60,524
दिनकर पाटील (शेकाप) 1,11,104
दत्तात्रय खानविलकर (जनता) 87,614

( काँग्रेस विजयी)
--------------------------------------------------------------
1984 दिनकर पाटील ( शेकाप) 2,12,194
ए.आर.अंतुले (अपक्ष) 1,73,270
अंबाजी पाटील (काँग्रेस इं) 63,032

(शेकाप विजयी)
--------------------------------------------------------------
1989 ए. आर. अंतुले (काँग्रेस) 3,33,950
दी. बा. पाटील (शेकाप) 2,18,516
नरेंद्र जाधव (भाजप) 61,383

( काँग्रेस विजयी)
--------------------------------------------------------------
1991 ए. आर. अंतुले (काँग्रेस) 2,19,639
दत्ता पाटील ( शेकाप) 1,79,933
सतीश प्रधान (शिवसेना) 96,880

( काँग्रेस विजयी)

--------------------------------------------------------------
1996 ए.आर.अंतुले (काँग्रेस) 2,13,187
अनंत तरे (शिवसेना) 2,09,180
अड.दत्ता पाटील 1,84,664

( काँग्रेस विजयी)
--------------------------------------------------------------
1998 रामशेठ ठाकूर (शेकाप) 2,48,353
बॅ.ए.आर. अंतुले (काँग्रेस) 2,39,227
अनंत तरे (शिवसेना) 2,08,459

(शेकाप विजयी)
--------------------------------------------------------------
1999 रामशेठ ठाकूर (शेकाप) 2,74,361
दी. बा. पाटील (काँग्रेस) 2,31,164
पुष्पा साबळे (इंनॅकॉ) 1,48,146

(शेकाप विजयी)
--------------------------------------------------------------

32 रायगड लोकसभा निकाल

2004 ए.आर. अंतुले (काँग्रेस) 3,12,225
शाम सावंत (शिवसेना) 1,64,242
विवेक पाटील (शेकाप) 2,80,355

( काँग्रेस विजयी)

--------------------------------------------------------------

2009 अनंत गीते (शिवसेना) 4,13,546
ए.आर. अंतुले (काँग्रेस) 2,67,025
प्रवीण ठाकूर (अपक्ष) 39,159

(शिवसेना विजयी)

--------------------------------------------------------------
2014 अनंत गीते (शिवसेना) 3,96,178
सुनील तटकरे (रा. कॉ) 3,94,068
रमेश कदम (शेकाप) 1,29,730

(शिवसेना विजयी)

--------------------------------------------------------------

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.