रायगड - कोरोना विषाणूमुळे शासनाने संचारबंदी लागू केल्याने राज्यातील तसेच परराज्यातील नागरिक जिल्ह्यात ठिकठिकाणी अडकले होते. शासनाने या अडकलेल्या नागरिकांना त्याच्या गावी पोहचविण्यासाठी प्रशासनामार्फत पुढाकार घेतला आहे. असेच एक सातारा जिल्ह्यातील मेंढपाळ कुटुंब दोन महिन्यांपासून भिलजी बोरघर गावात अडकले होते. अडकलेल्या या मेंढपाळ कुटुंबाला काँग्रेसने मदतीचा हात पुढे केला आहे.
अलिबाग तालुक्यातील भिलजी बोरघर याठिकाणी दरवर्षीप्रमाणे सातारा जिल्ह्यातून मेंढपाळ कुटुंब मेंढ्या, बकऱ्या घेऊन आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे हे कुटुंब अडकले होते. संचारबंदीत सर्व कामेही बंद झाल्याने या कुटुंबाचे आणि जनावरांचे खाण्यापिण्याचे हाल झाले होते. त्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रशासनाने त्याच्या आणि जनावरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती.
शासनाने परराज्यात आणि राज्यतील नागरिकांना त्याच्या गावी जाण्याची परवानगी दिली गेली. त्यानंतर मेंढपाळ कुटुंबही आपल्या गावी जाण्यासाठी धडपड करीत होते. यावेळी अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष ऍड. कौस्तुभ पुनकर यांनी पुढाकार घेऊन त्याचे ई पासेस तयार करून त्यांना बस आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करून सुखरूप मूळगावी पाठविले. या कुटुंबाने राज्याचे कॅबिनेट मंत्री सुनील केदार, महाराष्ट्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिक जगताप, रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अँड.प्रवीण ठाकूर, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.प्रथमेश पाटील, अॅड. कौस्तुभ पुनकर यांचे मेंढपाळ कुटुंबियांनी आभार मानले.
साताऱ्यातील मेंढपाळ कुटुंबाला युवक काँग्रेसने दिला मदतीचा 'हाथ' - काँग्रेसची मेंढपाळ कुटुंबाला मदत
अलिबाग तालुक्यातील भिलजी बोरघर याठिकाणी दरवर्षीप्रमाणे सातारा जिल्ह्यातून मेंढपाळ कुटुंब मेंढ्या, बकऱ्या घेऊन आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे हे कुटुंब अडकले होते.