ETV Bharat / state

निवडणूक काळात पैसे, दारू वाटणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर - जिल्हाधिकारी

निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे व दारूचे वाटप मोठ्या प्रमाणात केले जाते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी
author img

By

Published : Mar 14, 2019, 7:26 PM IST

रायगड - लोकसभा मतदारसंघात आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे व दारूचे वाटप मोठ्या प्रमाणात केले जाते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आचारसंहितेबाबत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने उपस्थित होते.

निवडणूक काळात मतदारांना वाटण्यासाठी राजकीय पक्षाकडून पैसे दिले जातात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा तैनात केली असून याद्वारे कार, दुचाकीची तपासणी करण्यात येणार आहे. या कारवाईत पैसे सापडले, तर जिल्हा प्रशासनाकडून बनविण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची समिती याची चौकशी करेल, असेही जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी पत्रकारांना सांगितले.

निवडणुकीत दारूचेही वाटप करण्यात येते. यासाठी उत्पादन शुल्क विभागाला सूचना दिल्या असून जिल्ह्यातील वाईन शॉप, बार यावर दारू विक्री वाढल्यास त्याची शहानिशा करण्यात येईल. त्यात दोषी आढळल्यास त्यांचे लायसन्स जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. दारू बणविणाऱ्या कंपनीवरही लक्ष देण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. वाईन शॉप व बार यांनी चालू व बंद करण्याची वेळ पाळायची आहे. अन्यथा याबाबत कसूर केल्यास लायसन्स जप्त करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात चार हजार दिव्यांग असून ज्यांना व्हीलचेअर दिलेल्या नसतील, त्या दिव्यांगांना व्हीलचेअर देण्याबाबत सूचना जिल्हा परिषदेला करण्यात आलेल्या आहेत. जेणेकरुन ते मतदान केंद्रापर्यंत सुखरुप पोहोचू शकतील. तसेच ज्याठिकाणी मतदान होणार आहे, त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पायऱ्या व स्वच्छता गृह आहेत का याबाबत तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. पायऱ्या व स्वच्छता गृह मोडकळीस आले असल्यास दुरुस्त करण्याचा सूचना दिल्या गेल्याची माहिती जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यात राजकीय लावलेले पोस्टर व पेंटिंग केलेल्या भिंती पुसण्याचे काम सुरू आहे. आचारसंहितेच्या अनुषंगाने ठिकठिकाणी चेक पोस्ट तयार केले आहेत. ज्यांना पोस्टर, होर्डिंग वा जाहिरात करायची आहे. त्यांनी रितसर परवानगी घ्यायची आहे. जिल्ह्यात २८ समित्या वेगवेगळ्या कामाबाबत नेमण्यात आल्या आहेत.

आचारसंहिता काळात कोणतीही नवीन कामे करण्यास बंदी आहे. सोशल मीडियावर ही लक्ष राहणार असून मीडिया समिती यावर लक्ष ठेऊन आहे. तसेच पुढे येणाऱ्या होळी, शिवपुण्यतिथी, चवदार तळे येथे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या राजकीय नेत्यांनी राजकीय भाष्य करण्यास बंदी असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे यावेळी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

Intro:निवडणूक काळात पैसे व दारू वाटणाऱ्यावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर

वाईन शॉप, बारमध्ये विक्री वाढल्यास लायसन्स होणार जप्त

धार्मिक सणात राजकीय भाष्यवर बंदी

रायगड : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता देशभर लागली असून रायगड लोकसभा मतदारसंघातही आचारसंहितेचे काटेकोर पणे पालन व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली गेलेली आहेत. निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे व दारूचे वाटप मोठ्या प्रमाणात केले जाते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवण्यात आलेली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आचारसंहिताबाबतची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने उपस्थित होते.

Body:निवडणूक काळात मतदारांना वाटण्यासाठी राजकीय पक्षाकडून पैसे दिले जातात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा तैनात केली असून याद्वारे कार, टुव्हीलर, याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या कारवाईत पैसे सापडले गेले तर जिल्हा प्रशासनाकडून बनविण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची समिती याची चौकशी करेल असे जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांना सांगितले.

निवडणुकीत दारुचेही वाटप करण्यात येत असते. यासाठी उत्पादन शुल्क विभागाला सूचना दिल्या असून जिल्ह्यातील वाईन शॉप, बार यावर दारू विक्री वाढली असल्यास त्याची शहानिशा करून त्यात दोषी आढळल्यास त्याचे लायसन्स जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच दारू बमविणाऱ्या कंपनी वरही लक्ष देण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागला दिले आहेत. तसेच वाईन शॉप व बार यांनी चालू व बंद करण्याची वेळ पाळायची आहे. अन्यथा याबाबत कसूर केल्यास लायसन्स जप्त करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात चार हजार दिव्यांग असून ज्यांना व्हीलचेअर दिलेल्या नसतील त्या दिव्यांगाना व्हीलचेअर देण्याबाबत सूचना जिल्हा परिषदेला करण्यात आलेल्या आहेत. जेणेकरून ते मतदान केंद्रापर्यत सुखरूप पोहचू शकतील. तसेच ज्याठिकाणी मतदान होणार आहे त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पायऱ्या व स्वच्छता गृह आहेत का याबाबत तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पायऱ्या व स्वच्छता गृह मोडकळीस आले असल्यास दुरुस्त करण्याचा सूचना दिल्या गेल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली

Conclusion:जिल्ह्यात राजकीय लावलेले पोस्टर व पेंटिंग केलेल्या भिंती ह्या पुसण्याचे काम सुरू आहे. आचारसंहितेच्या अनुषंगाने ठिकठिकाणी चेक पोस्ट तयार केले आहेत. ज्यांना पोस्टर, होर्डिंग वा जाहिरात करायची आहे. त्यांनी रीतसर परवानगी घ्यायची आहे. जिल्ह्यात 28 समित्या वेगवेगळ्या कामाबाबत नेमण्यात आल्या आहेत.
आचारसंहिता काळात कोणतीही नवीन कामे करण्यास बंदी आहे. सोशल मीडियावर ही लक्ष राहणार असून मीडिया समिती यावर लक्ष ठेऊन आहे. तसेच पुढे येणाऱ्या होळी, शिवपुण्यतिथी, चवदार तळे येथे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या राजकीय नेत्यांनी राजकीय भाष्य करण्यास बंदी असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आचारसंहितेचे काटेकोर पणे पालन करण्यासाठी सर्व जिल्ह्यातील अधिकाऱयांना सूचना दिल्या असल्याचे यावेळी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.