ETV Bharat / state

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच रायगड किल्ला संवर्धनासाठी 20 कोटी निधीची मंजूरी - मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला गतवैभव प्राप्त होण्यासाठी ६०० कोटी रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला होता. मात्र, भाजप सत्तेत असताना ५ वर्षात केवळ 60 कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र, महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच 20 कोटींचा निधी रायगडसाठी जाहीर केला.

raigad
छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती
author img

By

Published : Nov 30, 2019, 2:33 PM IST

Updated : Nov 30, 2019, 5:08 PM IST

रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला गतवैभव प्राप्त होण्यासाठी ६०० कोटी रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला होता. मात्र, 5 वर्षांत भाजप सरकारने यापैकी फक्त ६० कोटी निधी दिला होता. मात्र, आता महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच रायगड किल्ला संवर्धनासाठी २० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे रायगड किल्यावर रखडलेली कामांना आता गती मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य राजधानी रायगड किल्ल्यास निधी मंजूर केल्याने समस्त शिवभक्त आणि शिवसैनिकांनी आभार मानले. तसेच आनंदाचे वातावरण पसरले आहे. उर्वरित निधीही लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी शिवभक्तांकडून होत आहे.

रायगड

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड किल्ल्याला पसंती दिली होती. रायगड किल्ल्यावरून महाराजांनी स्वराज्याचा गाडा सांभाळला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगड किल्ला हा शिवभक्तांचे आराद्य दैवत आहे. रायगड किल्ल्याला पूर्वीचे गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी 2014 मध्ये राज्य सरकारने रायगड प्राधिकरण स्थापन करून किल्ला संवर्धनाचे काम हाती घेतले. या समितीचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे असून त्यांच्या देखरेकीखाली रायगड किल्ला संवर्धनाचे काम सुरू आहे. यासाठी फडणवीस सरकारने ६०० कोटी रुपये मंजूर केले. प्राधिकारणातून रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०० कोटी निधीपैकी फक्त ६० कोटी निधी पाच वर्षात राज्य सरकारने जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे वर्ग केले होते. मात्र, त्यानंतर राज्य शासनाकडून एक रुपयाचाही निधी वर्ग केलेला नव्हता. त्यामुळे अनेक कामे ही निधी अभावी रखडलेली होती.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच रायगड किल्ला संवर्धन कामासाठी २० कोटी निधी कॅबिनेट बैठकीत मंजूर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड किल्ला संवर्धन कामासाठी दिलेल्या निधीमुळे रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. आगामी काळातही रायगड किल्ला संवर्धन कामासाठी लवकर निधी मिळण्याची आशा शिवभक्त आणि शिवसैनिकामध्ये निर्माण झालेली आहे.

रायगड किल्ला प्राधिकरणाअंतर्गत आलेल्या ६० कोटी रुपये निधीच्या माध्यमातून किल्ल्यावरील कामांना सुरुवात केली. किल्ल्यावरील तटबंदी, दरवाजे, पायऱ्या, गडावरील घरेही पूर्वी सारखीच दिसावी या पद्धतीने काम सुरू करण्यात आलेले आहे. यासाठी किल्यावर पुरातत्त्व विभागाकडून खोदकाम करण्यात आले असून अजून खोदकाम सुरू आहे. चित्त दरवाजा ते महा दरवाजापर्यंत दगडी पायऱ्यांचे काम पूर्ण होत आलेले आहे. किल्ल्यावरील पाण्याची सोय व्हावी यासाठी महाराजांनी बांधलेली 84 टाक्यांमधील गाळ काढण्यात आलेला आहे.

गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पिणाच्या पाण्याची आणि स्वच्छता गृहाची कामे प्रगती पथावर आहेत. रोपवे ते नगारखानापर्यंत पादचारी मार्ग पूर्ण झाला आहे. जगदिश्वेर आणि वाडेश्वर मंदिराचे केमिकल केंजुरेशन काम पूर्ण झाले आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या 21 गावच्या रस्त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. महादरवाजा ते शिरकाई मंदिर येथील पादचारी रस्त्याची कामे, महादरवाजा तटबंदी, मनोरे, जगदीश्वर मंदिर पादचारी रस्ता या कामांना मंजुरी मिळाली असून ही कामे लवकरच सुरू होणार असल्याचे विशेष नियुक्त अभियंता शिवाजी सातपुते यांनी सांगितले.

मंजूर केलेल्या निधीपैकी १० टक्केही निधी देण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरले होते. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच रायगड किल्ला संवर्धन कामासाठी २० कोटी मंजूर केले. त्यामुळे आगामी काळात किल्याच्या कामासाठी निधी कमी पडणार नाही, अशी आशा शिवभक्तांना निर्माण झाली आहे.

Intro:उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच रायगड किल्ला संवर्धन कामास दिले वीस कोटी

रायगड किल्ला संवर्धन कामासाठी मंजूर सहाशे कोटी पाच वर्षात दिले फक्त साठ कोटी

रखडलेली कामे आता लवकर। होणार पूर्ण

उर्वरित निधीही लवकर देण्याची शिवभक्तांची मागणी

रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्याला गतवैभव प्राप्त होण्यासाठी सहाशे कोटी रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. मात्र पाच वर्षात भाजप सरकारने यापैकी फक्त साठ कोटी निधी दिला होते. मात्र आता महा विकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच रायगड किल्ला संवर्धन साठी वीस कोटी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे रायगड किल्यावर रखडलेली कामे आता प्रगतीपथावर येण्यास सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य राजधानी रायगड किल्यास निधी मंजूर केल्याने समस्त शिवभक्त आणि शिवसैनिकांनी आभार मानले असून आनंदाचे वातावरण पसरले आहे. उर्वरित निधीही लवकरात लवकर मिळावा अशी मागणी। शिवभक्तांकडून होत आहे.

Body:छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड किल्याला पसंती दिली होती. रायगड किल्ल्यावरून महाराजांनी स्वराज्याचा गाडा सांभाळला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगड किल्ला हा शिवभक्तांचे आराध्य दैवत आहे. रायगड किल्याला पूर्वीचे गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी 2014 मध्ये राज्य सरकारने रायगड प्राधिकरण स्थापन करून किल्ला संवर्धनाचे काम हाती घेतले. या समितीचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे असून त्यांच्या देखरेकीखाली रायगड किल्ला संवर्धनाचे काम सुरू आहे. यासाठी फडणवीस सरकारने सहाशे कोटी रुपये मंजूर केले. प्राधिकारणातून रायगड किल्ला संवर्धनासाठी सहाशे कोटी निधीपैकी फक्त साठ कोटी निधी पाच वर्षात राज्य सरकारने जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे वर्ग केले  होते. मात्र त्यानंतर राज्य शासनाकडून एक रुपयाचाही निधी वर्ग केलेला नव्हता. त्यामुळे अनेक कामे ही निधी अभावी रखडलेली होती.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महा विकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच रायगड किल्ला संवर्धन कामासाठी वीस कोटी निधी कॅबिनेट बैठकीत मंजूर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड किल्ला संवर्धन कामासाठी दिलेल्या निधीमुळे रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. आगामी काळातही रायगड किल्ला संवर्धन कामासाठी लवकरात लवकर निधी मिळण्याची आशा शिवभक्त आणि शिवसैनिकामध्ये निर्माण झालेली आहे.

Conclusion:रायगड किल्ला प्राधिकरण अंतर्गत आलेल्या साठ कोटी रुपये निधीच्या माध्यमातून किल्ल्यावरील कामांना सुरुवात केली. किल्ल्यावरील तटबंदी, दरवाजे, पायऱ्या, गडावरील घरे ही पूर्वी सारखीच दिसावी या पद्धतीने काम सुरू करण्यात आलेले आहे. यासाठी किल्यावर पुरातत्व विभागाकडून खोदकाम करण्यात आले असून अजून खोदकाम सुरू आहे. चित्त दरवाजा ते महा दरवाजा पर्यत दगडी पायऱ्यांचे काम पूर्ण होत आलेले आहे. किल्ल्यावरील पाण्याची सोय व्हावी यासाठी महाराजांनी बांधलेली 84 टाके यामधील गाळ काढण्यात आलेला आहे.

गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पिणाच्या पाण्याची आणि स्वच्छता गृहाच्या कामे प्रगती पथावर आहेत. रोपवे ते नगारखाना पर्यत पादचारी मार्ग पूर्ण झाला आहे. जगदिश्वेर आणि वाडेश्वर मंदिराचे केमिकल केंजुरेशन काम पूर्ण झाले आहे.  रायगड किल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या 21 गावच्या रस्त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. महा दरवाजा ते शिरकाई मंदिर येथील पादचारी रस्त्याची कामे, महादरवाजा तटबंदी, मनोरे, जगदीश्वर मंदिर पादचारी रास्ता या कामांना मंजुरी मिळाली असून ही कामे ही लवकरच सुरू होणार असल्याचे विशेष नियुक्त अभियंता शिवाजी सातपुते यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त जनतेचे आराध्य दैवत आहे. रायगड किल्ला हा स्वराज्याची राजधानी आहे. या किल्याला पुन्हा मूर्तरुप देण्याचे राज्य शासनाने ठरविले होते. मात्र। मंजूर केलेल्या निधी पैकी दहा टक्केही निधी देण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरले होते. महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच रायगड किल्ला संवर्धन कामासाठी वीस कोटी मंजूर केले. त्यामुळे आगामी काळात किल्याच्या कामासाठी निधी कमी पडणार नाही अशी आशा शिवभक्तांना निर्माण झाली आहे.
Last Updated : Nov 30, 2019, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.