ETV Bharat / state

पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीमुळे पोलीस आणि नागरिकांची गैरसोय, हद्दीत बदल करण्याची मागणी

कोलवाडी, वलप, पाले बुद्रुक, हेदुटणे, चिंध्रण, वावंजे, खैरणे ही गावे तळोजा पोलिसांत आहेत. मात्र, त्यांची हद्द पनवेल तालुका पोलीस ठाण्यात येते. बाजूलाच तळोजा पोलीस स्टेशन असताना तळोजातील नागरिकांना केवळ हद्दीच्या विषयापायी इतका मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे.

पनवेल पोलीस ठाणे
author img

By

Published : Nov 12, 2019, 2:14 PM IST

रायगड - पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीचा विषय सध्या वादात अडकला आहे. या हद्दीमुळे पोलीस कर्मचारी आणि नागरिक दोघांनाही अडचण होत असल्याचे सांगितले जात आहे. तळोजा परिसरातील नागरिकांना १५ किलोमीटर पायपीट करुन पनवेल ठाणे गाठावे लागत आहे. त्यामुळे तळोजातील सात गावे जवळच्या पोलीस ठाण्याला जोडण्यात यावीत अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.

पनवेल तालुक्यामध्ये सात पोलीस ठाणी आहेत. यातील पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत शहरालगतच्या गावांचा समावेश होतो. मात्र, ही बाब पोलिसांसह तक्रारदारांना त्रासदायक ठरते. पूर्वी शहराचे आकारमान छोटे होते. शहरातून बाहेर पडण्यासाठी फार तर १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागायचा. पण, आता तळोजा मध्ये काही गुन्हा घडल्यास त्याची तक्रार नोंदवण्यासाठी एक ते दीड तासाचा कालावधी खर्ची करून पनवेल तालुका पोलीस स्टेशन गाठव लागते. तालुका पोलील ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनादेखील याच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत कर्मचारी बोलून दाखवतात.

२००७ पर्यंत ग्रामीण हद्द रायगड पोलिसांकडे होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली हा परिसर होता. परंतु, त्यानंतर हा भाग नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिकाराखाली जोडण्यात आला. २०१३ मध्ये खांदेश्वर, कामोठे हे दोन नवीन पोलीस ठाणे झाले. त्यामुळे पूर्वीच्या पनवेल शहर आणि कळंबोली पोलीस ठाण्याची हद्द विभागली गेली. परंतु पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे क्षेत्र आहे इतकेच राहिले. खालापूर, पेण आणि ठाणे हद्दीपर्यंत या पोलिसांची सीमा आहे.

कोलवाडी, वलप, पाले बुद्रुक, हेदुटणे, चिंध्रण, वावंजे, खैरणे ही गावे तळोजा पोलिसांत आहेत. मात्र, त्यांची हद्द पनवेल तालुका पोलीस ठाण्यात येते. बाजूलाच तळोजा पोलीस स्टेशन असताना तळोजातील नागरिकांना केवळ हद्दीच्या विषयापायी इतका मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे.

यासंदर्भात भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी आणि कळंबोली शहर उपाध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू केला. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव अजोय मेहता यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रस्ताव गृहविभागाचे सचिव संजयकुमार यांच्याकडे पाठवला आहे. त्याचबरोबर रणवरे यांनी परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहायक आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्यासह स्थानिक पोलीस स्टेशनना पत्र दिले आहे.

Intro:सोबत फाईल फुटेज जोडले आहेत
पनवेल

पनवेल तालुका पोलिस स्टेशनची हद्द म्हणजे असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे. पोलिसांसह तक्रारदारांनादेखील हद्दीचा विषय अडचणीचा ठरत आहे. तळोजा परिसरात नागरिकांना तर बाजूलाच तळोजा पोलिस स्टेशन असताना सुद्धा केवळ हद्दीचा विषय आड येत असल्याने 15 कि. मी. अंतर पायपीट करून पनवेल तालुका पोलीस स्टेशन गाठाव लागतं. त्यामुळे तळोजातील एकूण सात गावे जवळच्या पोलीस ठाण्याला जोडण्यात यावीत, असा प्रस्ताव पनवेल तालुका भाजपने राज्य शासनाला दिला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाने हा प्रस्ताव गृहसचिवांकडे पाठवला आहे.Body:पनवेल तालुक्यामध्ये सात पोलीस ठाणी आहेत. यातील पनवेल तालुका पोलिस स्टेशन हद्दीत शहरालगतच्या गावांचा समावेश होतो. मात्र, ही बाब पोलिसांसह तक्रारदारांना त्रासदायक ठरते. पूर्वी शहराचे आकारमान छोटे होते. शहरातून बाहेर पडण्यासाठी फार तर १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागायचा. तळोजा मध्ये काही गुन्हा घडल्यास त्याची तक्रार नोंदवण्यासाठी कधी-कधी एक ते दीड तासाचा कालावधी खर्ची करून पनवेल तालुका पोलीस स्टेशन गाठव लागतं. तालुका पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनादेखील याच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत कर्मचारी बोलून दाखवतात.

२००७ पर्यंत ग्रामीण हद्द रायगड पोलिसांकडे होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली हा परिसर होता; परंतु त्यानंतर हा भाग नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिकाराखाली जोडण्यात आला. २०१३ मध्ये खांदेश्वर, कामोठे हे दोन नवीन पोलीस ठाणे झाले. त्यामुळे पूर्वीच्या पनवेल शहर आणि कळंबोली पोलीस स्टेशनची हद्द विभागली गेली; परंतु पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे क्षेत्र आहे इतकेच राहिले. खालापूर, पेण आणि ठाणे हद्दीपर्यंत या पोलिसांची सीमा आहे. १०० पेक्षा जास्त गावांतील कायदा आणि सुव्यवस्था त्यांना पाहवी लागते. त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर ताण येतो. तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठीसुद्धा गैरसोयीचे आहे. पडण्यासाठी कधी-कधी एक ते दीड तासाचा कालावधी खर्ची होतो. तालुका पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनादेखील याच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत कर्मचारी बोलून दाखवतात. गुन्ह्याची तक्रार आल्यानंतर इथल्या कर्मचाऱ्यांना ही तत्काळ घटनास्थळी जाण्यासाठी मर्यादा येत असल्यानं गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नाही. कोलवाडी, वलप, पाले बुद्रुक, हेदुटणे, चिंध्रण, वावंजे, खैरणे ही गावे तळोजा पोलिसांत आहेत. मात्र, त्यांची हद्द पनवेल तालुका पोलीस ठाण्यात येते. बाजूलाच तळोजा पोलीस स्टेशन असताना तळोजातील नागरिकांना केवळ हद्दीच्या विषयापायी इतका मनस्ताप करावा लागतो. Conclusion:यासंदर्भात भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी आणि कळंबोली शहर उपाध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू केला. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव अजोय मेहता यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रस्ताव गृहविभागाचे सचिव संजयकुमार यांच्याकडे पाठवला आहे. त्याचबरोबर रणवरे यांनी परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहायक आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्यासह स्थानिक पोलीस स्टेशनना पत्र दिले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.