ETV Bharat / state

पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकास लुटले - पेण गुन्हे बातम्या

ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सुमारे 6 तोळे वजनाच्या 2 सोन्याच्या चैन भामट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. पेण शहरातील काका मनोहर चाळीसमोर हा प्रकार घडला.

पेण
पेण
author img

By

Published : Oct 24, 2020, 3:57 PM IST

पेण (रायगड) - पोलीस असल्याची बतावणी करून एका 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सुमारे 6 तोळे वजनाच्या 2 सोन्याच्या चैन भामट्यांनी चोरून नेल्या. पेण शहरातील काका मनोहर चाळी समोर हा प्रकार घडला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील विठोबा चांगू म्‍हात्रे उर्फ कणेकर भाऊजी (वय 75) हे कामानिमित्त सकाळी 10 च्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून जात होते. पेण शहरातील काका मनोहर चाळ या ठिकाणी आल्यानंतर एका भामट्याने आपण पोलीस असल्याची बतावणी केली. पोलिसांनी कालच गांजा तस्करी करणाऱ्या व्यक्तींना पकडले आहे. म्हणून त्यांनी म्हात्रे यांच्या पिशवीची तपासणी केली. यावेळी मागून येणाऱ्या आणखीन एका युवकाच्या पिशवीची सुद्धा या भामट्याने तपासणी केली तसेच सदर युवकाला गळ्यातील सोन्याची चैन काढून त्याच्या खिशात ठेवायला सांगितली. यानंतर या भामट्याने म्हात्रे यांच्या गळ्यातील 2 सोन्याच्या चैन काढायला त्या युवकाला सांगितले. या चैन काढून म्हात्रे यांच्या हातात दिल्या. यानंतर त्या चैन या भामट्याने म्हात्रे यांच्या हातून हिसकावून घेऊन त्यांच्या पिशवीत ठेवल्याचा बहाणा केला व चैन घेऊन तेथून दुचाकीवर बसून पोबारा केला. यानंतर विठोबा म्हात्रे यांनी सोन्याच्या चैनीचा शोध आपल्या पिशवीत घेतला असता त्या आढळून आल्या नाहीत. या संदर्भात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पेण पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.