ETV Bharat / state

एसटी झाली 71 वर्षांची..! रायगडात महामंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

रायगड जिल्ह्यातही एसटी आगारात एसटीचा वर्धापन दिन केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अलिबाग आगारामार्फत एसटी महामंडाळाचा ७१ वां वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत कामगारांचा सत्कार करण्यात आला.

एसटीचा वर्धापन दिन केक कापून उत्साहात साजरा
author img

By

Published : Jun 1, 2019, 4:57 PM IST

रायगड - जिल्ह्यातही एसटी आगारात एसटीचा वर्धापन दिन केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अलिबाग आगारामार्फत एसटी महामंडाळाचा ७१ वां वर्धापन दिन साजरा करण्यात आला. एसटीचा लाल डब्बा बदलून आता बसमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. एसटीने आता जुनी कात टाकून नव्या रुपात प्रवाशांसाठी 'शिवशाही' सेवा सुरू केली आहे, अशी भावना रायगड विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी व्यक्त केली आहे.
एसटी बसचा आज 71 वा वर्धापन दिन राज्यात साजरा होत आहे. अलिबाग आगरामार्फत एसटी बस वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात आठ एसटी आगार असून साडे पाचशे बसेस प्रवाशांच्या सेवेत आहेत. एसटीचे 3 हजार कर्मचारी प्रवाशांच्या सेवेत कार्यरत असून जिल्ह्यात वर्षाला दीड लाख प्रवासी एसटी बसने प्रवास करतात.

एसटी झाली 71 वर्षांची

जुन्या लाल परीने आता कात टाकली असून शिवनेरी, शिवशाही, हिरकणी, विठाई या आरामदायी, सुखकारक, वातानुकूलित बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या असल्याचीही माहिती बारटक्के यांनी दिली. रायगड एसटी कर्मचाऱ्यांनी बसचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही बारटक्के यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत कामगारांचा सत्कार करण्यात आला.

Intro:एसटीचा 71 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

रायगड : एसटीचा लाल डब्बा बदलून आता बसमध्ये आमूलाग्र बदल झाला असून एसटीने आता जुनी कात टाकून प्रवाशांच्या सेवेसाठी नव्या रुपात आलेली आहे. अशी भावना रायगड विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी व्यक्त केली आहे.

एसटी बसचा आज 71 वा वर्धापन दिन राज्यात साजरा होत आहे. रायगड जिल्ह्यातही एसटी आगारात एसटीचा वर्धापन दिन केक कापून उत्साहात साजरा केला. अलिबाग आगरामार्फत एसटी बस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी, कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.Body:रायगड विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी एस्टीबाबत आपली भावना भाषणातून व्यक्त केली. रायगड जिल्ह्यात आठ एसटी आगर असून साडे पाचशे बसेस प्रवाशांच्या सेवेत आहेत. एसटीचे 3 हजार कर्मचारी प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहेत. जिल्ह्यात वर्षाला दीड लाख प्रवासी एसटी बसने प्रवास करीत आहेत. जुन्या लाल डब्याने आता कात टाकली असून शिवनेरी, शिवशाही, हिरकणी, विठाई या आरामदायी, सुखकारक, वातानुकूलित बसेस प्रवाशांच्या सेवेत काही वर्षात दाखल झाल्या आहेत. अशी माहिती बारटक्के यांनी आपल्या भाषणातून दिली.
Conclusion:यावेळी रायगड एसटी कर्मचाऱ्यांनी बसचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही बारटक्के यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना केले. यावेळी गुणवंत कामगारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरानीही भाषणे केली. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर एसटी कर्मचारी, अधिकारी यांनी प्रवाशांना गुलाब पुष्प व पेढे वाटले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.