रायगड - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आजचा बालदिन साजरा करण्यासाठी पनवेलमधल्या सेंट जोसेफ शाळेत चक्क विद्यार्थी रुपातील पंडित नेहरी अवतरले होते. या शाळेतील विद्यार्थ्यांनी चाचा नेहरू यांच्या वेशभूषा परिधान करत मैं भी नेहरु म्हणत चाचा नेहरूंना आदरांजली वाहिली.
यावेळी बालचमुंनी आम्हीही चाचा नेहरुंचा आदर्श समोर ठेऊन देशासाठी चांगले काम करु, अशी प्रतिज्ञा केली. त्याचबरोबर सर्व लहानग्यांनी गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करत आपला आनंद व्यक्त केला. फुगे उडवून सगळ्यांसोबत खेळत या लहानग्यांनी आजचा बालदिवस मजेत साजरा केला. या बालदिनामध्ये शिक्षकांनी आज विविध कार्यक्रम घेऊन या बालकांचे मनोरंजन केले. यावेळी शाळेने या लहानग्यांना चॉकलेट आणि केकचे वाटप करत त्यांचा आनंद द्विगुणित केला. मुख्याध्यापिका फरजाणा तुंगेकर आणि सुपरवायझर सरस्वती मॅडम यांनी बालदिनाचे महत्व आणि नेहरू यांच्याविषयी माहिती देऊन शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.